पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चुरशीची लढत सुरु होती. त्यावेळी शहरातील रस्ते ओस पडले होते नेमकी हीच संधी साधत चोरटयांनी पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असलेल्या एका वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.ही घटना शिवणे येथील एनडीए रस्त्यावर असलेल्या आर.आर.वाईन्स दुकानात घडली. यावेळी दरोडेखोरांनी हातात कोयते आणि बंदुक घेऊन उत्तम नगर भागात गुंडाची दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दरोडा दरोडेखोरांनी ३ लाख १२ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीन गुन्हेगारांना अटक केली करून पुढील चौकशी करून इतर गुन्हेगारांना शोधण्याचे काम सुरू केले आहे
हिंदुस्थान समाचार
