भंडारा २८ नोव्हेंबर (हिं. स.) : पणन विभागांतर्गत खरेदी केंद्र चालक संस्थांना खरीप धान खरेदीचे निर्देश निर्गमित होण्यापूर्वीच काही केंद्र चालक संस्थांनी खरीप धानाची खरेदी करून अवैधरित्या धान पिकाची साठेबाजी केल्याचा आरोप होता. याप्रकरणी जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार चौकशी दरम्यान खरेदी केंद्र चालक संस्थेलगतच्या राईस मिल मधील गोदामात धान पिकाचा अवैध साठा आढळून आल्याने तब्बल तीन लाख 2 हजार रुपयांचा दंडाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई भंडारा जिल्ह्याच्या आसोला येथील अनुप बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या आधारभूत खरेदी केंद्राच्या जवळील आशीर्वाद राईस मिलमध्ये करण्यात आली आहे. या गोदामात 4 हजार 400 क्विंटल धानाचा अवैध साठा आढळून आला.
हिंदुस्थान समाचार
