बीड, 30 जानेवारी, (हिं.स.)। बीड शहरातील कॅनाल रोड परिसरात विनापरवाना देशी व विदेशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांनी धडक कारवाई केली. ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
कॅनाल रोडवरील दिव्या बिअर शॉपीसमोर पत्र्याच्या टपरीजवळ एक इसम अवैधरित्या दारूची विक्री करीत आहे. अशी माहिती मिळाली. संबंधित ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता एक इसम सुझुकी अॅक्सेस स्कुटीच्या डिक्कीत दारू ठेवून विक्री करताना रंगेहात सापडला. स्कुटीच्या डिक्कीतून मॅकडोल, – ऑफिसर चॉईस ब्ल्यू व मास्टर डिलाईट या कंपनींच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. तसेच विनानंबर प्लेटची सुझुकी अॅक्सेस स्कुटी असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बीड शहरातील कॅनॉल रोड भागात अवैधरित्या दारुच्या अड्यावर छापा टाकून पोलिसांनी आरोपीस मुद्देमालासह अटक केली आहे. या प्रकरणी आरोपी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपनिरीक्षक माधव काटकर, पोलीस हवालदार सचिन आगलावे, रवी आघाव यांनी केली आहे. बीड शहरातील शिवाजी नगर पोलीसांनी अवैध दारुची विकी करणारांविरूध्द कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis
