नाशिक, ०८ नोव्हेंबर (हिं.स.) : प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला व तंबाखू चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करणाऱ्या जनरल स्टोअर्सवर छापा टाकून पथकाने सुमारे ६१ हजारांचा गुटखा जप्त करून दुकानदारास अटक केली आहे.याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की संशयित नीलेश राजेंद्र भालेराव (वय ३०, रा. सिद्धार्थनगर, राजवाडा, देवळाली गाव) याचे अथर्व जनरल स्टोअर्सनावाचे दुकान आहे. या दुकानात आरोपी भालेराव याने स्वत:च्या फायद्यासाठी प्रतिबंधित असलेला ६१ हजार ६३५ रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला, तंबाखू, गुटख्याचा साठा चोरट्या मार्गानि विक्री करण्याच्या मागि केलेला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा मारून हा गुटखा जप्त केला असून, दुकानदार नीलेश भालेराव याला अटक केली आहे या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
