ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत कारवाई मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेत एकूण 102 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. तसेच, 38 हजार 450 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे व त्यांच्या पथकाने केली.
BulletsIn
- कळवा प्रभाग समिती क्षेत्रातून 9 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 9 हजार रुपयांचा दंड वसूल.
- मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार 500 रुपयांचा दंड वसूल.
- दिवा प्रभाग समिती क्षेत्रातून 10 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 3 हजार 500 रुपयांचा दंड वसूल.
- उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातून 9 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार रुपयांचा दंड वसूल.
- नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 7 हजार रुपयांचा दंड वसूल.
- वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातून 10 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 1 हजार रुपयांचा दंड वसूल.
- लोकमान्य सावरकर प्रभाग समिती क्षेत्रातून 9 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 5 हजार 700 रुपयांचा दंड वसूल.
- वागळे प्रभाग समिती क्षेत्रातून 13 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 7 हजार 250 रुपयांचा दंड वसूल.
- माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातून 14 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 2 हजार 500 रुपयांचा दंड वसूल.
- महापालिकेच्या 9 प्रभाग समिती क्षेत्रातून एकूण 38 हजार 450 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
