पुणे, 19 ऑक्टोबर ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी नुकतेच चेन्नई इथून अटक केली आहे. यानंतर आता ससून रुग्णालयातून पळून जाणं आणि यासाठी त्याला कोणी मदत केली याच्या तपासासाठी पुणे पोलीस देखील ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. पुणे पोलीस त्याच्यावर मोक्का अतंर्गत कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुंबई पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. यापार्श्वभूमीवर ललित पाटीलवर आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मोक्का लावण्याच्या हालचाली पुणे पोलिसांनी सुरु केल्या आहेत.
