अकोला शहरातील वाशिम बायपास चौक येथे अफरोज खान मनवर खान (वय अंदाजे 32, राहणार हमजा प्लॉट) याच्यावर शनिवारी 13 जुलैच्या रात्री 10 वाजता अज्ञात युवकांनी चाकू सारख्या धारदार शस्त्राने प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अफरोज खान याचा आज सकाळी उपचार दरम्यान मृत्यु झाला आहे. त्यामुळे आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BulletsIn
- शनिवारी 13 जुलैच्या रात्री 10 वाजता हल्ला झाला.
- वाशिम बायपास चौक, टी पॉइंट जवळील घटना.
- अफरोज खान मनवर खान (वय 32) हल्ल्यात जखमी.
- अफरोजला नागरिकांच्या सहकार्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले.
- त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरु.
- उपचारादरम्यान अफरोज खानचा मृत्यू झाला.
- डॉक्टरांनी रविवारी सकाळी मृत घोषित केले.
- पोलीस निरिक्षक नितिन लेवरकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
- अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले.
- जुन्या वैमनस्यातून हल्ल्याची शक्यता.
- अकोला जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
