पुणे, 27 जानेवारी : वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित महाराजाने केल्याची घटना आज आळंदीत उघड झाली. याप्रकरणी आळंदी पोलीस स्टेशनला कलम भादंवी ३७७ व पोस्को कायदा कलम ४ ५ ( f ) ६ ८ १० अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर उर्फ आळंदीकर (वय:५२,रा. घुंडरे गल्ली, आळंदी देवाची,ता.खेड,जि पुणे) असे भोंदू महाराज आरोपीचे नाव असुन आळंदी पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.
संबंधित आरोपीला दिघी येथिल लाॅकअप मधे ठेवले आहे.आळंदी पोलिसांनी सांगितलेल्या माहीतीनुसार, याप्रकरणी फिर्याद पिडित बालकांच्या नातेवाईकांनी दिली आहे.आरोपी दासोपंत उंडाळकर हा मुळचा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील असून गेली तीस वर्षापेक्षा अधिक काळ आळंदीत राहत आहे. पिडित तीनही विद्यार्थी मुळचे परभणी जिल्ह्यातीलच आहेत. आरोपी दासोपंत उंडाळकर याने पिडित विद्यार्थ्यांवर मागील तीन महिन्याच्या कालावधीमध्ये वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगीतले.दरम्यान आज आळंदी पोलिसांत तक्रार देणेसाठी आले. आरोपी प्रतिष्ठित महाराज असल्याने विविध स्तरावरून राजकीय दबावही पिडितांच्या पालक आणि पोलिसांवर असल्याची चर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात होती.
