भंडारा, – भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरात धिरेंद्र शास्त्री ( बागेश्वर बाबा ) यांचं सत्संग सुरू आहे. त्यांनी सत्संगामध्ये मानव धर्माचें संस्थापक जूमदेव ठूब्रिकर यांच्या विरुध्द आक्षेपार्ह विधान करत टीका केली आहे. त्यामुळे लाखो सेवकांच्या भावना दुखावल्याने भंडारा गोंदिया जिल्हयातील विविध पोलिस स्टेशन येथे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली पण अद्यापही कुठलीही कारवाही झाली नाही. म्हणुन हजारोच्या संख्येने सेवकांनी (नागरीक ) मोहाडी पोलिस स्टेशन गाठले. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आली होती. नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थीत झाले. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आता पोलिस अधीक्षक यांनी आयोजक व धिरेंद्र शास्त्री यांच्या विरुध्द 295 कलम अन्तर्गत गुन्हा दाखल केला आहे.
