सोलापूर 27 नोव्हेंबर ( हिं.स) :शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना सकाळच्या सुमारास होटगी ब्रीज येथे घटना घडली आहे. सचिन श्रीमंत चौधरी वय 23 राहणार औरंगाबाद असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मयत तरूण हा अश्विनी हॉस्पिटल कुंभारी येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. आत्महत्याचे कारण अद्याप समजले नसून मृतदेह शववच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस करत आहे.
हिंदुस्थान समाचार
