सोलापूर 16 नोव्हेंबर ( हिं.स) :शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने केशव नगर पोलीस वसाहतीत रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट (वय ३५) असं पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. आज सकाळी दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट हे पोलिस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होते, अशी माहिती मिळत आहे.
सोलापूर शहर पोलिस दलातील एका पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने सोलापूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी राहुल शिरसट यांना मृत घोषित केले आहे.
हिंदुस्थान समाचार
