cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > राडारोडा वाहून नेणाऱ्या डम्परवर भरारी पथकाची कारवाई, दोन वाहनांना दंड
Crime

राडारोडा वाहून नेणाऱ्या डम्परवर भरारी पथकाची कारवाई, दोन वाहनांना दंड

CliQ INDIA
Last updated: December 10, 2023 4:00 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

ठाणे, 9 डिसेंबर (हिं.स.) : हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांची पाहणी सुरू आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर नाका येथे भरारी पथकाने राडारोडा वाहून नेणाऱ्या दोन गाड्यांवर कारवाई केली.

परिमंडळ दोनचे उपायुक्त आणि पर्यावरण विभाग यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एकूण १४० डम्पर वाहने तपासण्यात आली. त्यापैकी दोन वाहने बांधकामाचा राडारोडा ठाण्याच्या हद्दीत आणत होती. त्या वाहनांना जॅमर लावण्यात आला. तसेच, प्रत्येकी पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाईही करण्यात आली. हे भरारी पथक या परिसरात अशाचप्रकारे अचानक भेट देऊन कारवाई करणार असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.

त्याचबरोबर, ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या डम्परला राडारोडा वाहतुकीचा स्कॅन कोड असणे बंधनकारक आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेचा राडारोडा वाहतुकीस परवानगी असल्याचा परवाना आवश्यक आहे. त्याचबरोबर, गौण खनिजाची वाहतूक करताना त्याच्या रॉयल्टीची पावती सोबत असणे आवश्यक आहे. तसे याची माहिती देणारा फलक या भागात लावला जाणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी सांगितले.

आतापर्यंत, महिनाभरात अशा १३८ वाहनांवर कारवाई करून ०५ लाख १३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, कचरा जाळणाऱ्या ५३ घटना नोंदवण्यात आल्या असून त्यांच्याकडून दंडापोटी ०२ लाख ०९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हवा प्रदूषण तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन

ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत. त्याचसोबत, ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार, हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची हेल्पलाईन (८६५७८८७१०१) सुरू करण्यात आली आहे. त्यावर आतापर्यंत २२ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रात होत असलेल्या हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी ८६५७८८७१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

उघड्यावर कचरा जाळणे, बांधकाम होत असताना परिसरात धूळ/ धूराचा उपद्रव होणे, रस्त्यावरील बांधकाम कचरा/डेब्रिजची (C & D Waste) विना- आच्छादन वाहतूक, रस्त्यांच्या कामांमुळे होणारे धुळीचे प्रदूषण, बांधकामाचा कचरा इतस्ततः टाकला जाणे, हॉटेल-बेकरीमधून होणारे धूळ/ धुराचे प्रदूषण, रसायनांचा येणारा उग्र वास, वाहनांचे अवैध पार्किंग, इत्यादी हवा प्रदूषणाबाबतच्या तक्रारी नागरीक हेल्पलाईनवर व्हॉट्सॲपद्वारे छायाचित्रासह नोंदवू शकतात.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

इगतपुरी : महामार्गावर सशस्त्र दरोड्यात ४ कोटींचा ऐवज लंपास
अमरावती : परतवाडा शहरात क्रिकेट सट्टेबाजीची मोठी उलाढाल | BulletsIn
सोलापूर : मुलाने वडिलांवर केला कुऱ्हाडीने हल्ला | BulletsIn
सतीश वाघ खून प्रकरणात आणखी एकाला अटक | BulletsIn
जळगाव – नायब तहसीलदारांची दुचाकी चोरी; तिघे संशयित गजाआड

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article प्रितम-अंजलीची बांधली जाणार लग्नगाठ – Hindusthan Samachar Marathi
Next Article पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृश्य संवादाने काल्हेर ग्रामस्थ झाले प्रेरित
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?