सोलापूर 5 डिसेंबर ( हिं.स) डॉक्टरांच्या व पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह लाऊन दिलेल्या भटजीसह सहा जणांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.
मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, पीडित बालिका ही 1 डिसेंबर रोजी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात टी टी चे इंजेक्शन घेण्यासाठी सासू व पती सोबत आली होती. डॉक्टरांना तिच्या वया बाबत संशय आल्याने त्यांनी तिच्या आधार कार्ड वरील जन्म तारीख पाहिली त्यावेळी ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले, तर ती गर्भवतीही असल्याचे समजले.
दरम्यान डॉक्टरांनी ही घटना मोहोळ पोलिसांना कळविली. मोहोळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती अंजना फाळके यांनी सदर बालिकेकडे चौकशी केली असता, ती अल्पवयीन असताना तिच्या नातेवाईकांनी तिचा विवाह लावून दिल्याचे तिने सांगितले.
हिंदुस्थान समाचार
