नाशिक, २६ नोव्हेंबर, (हिं.स) – पैशाचे आमिष दाखवून धर्मांतरण करण्याचा प्रकार नाशिक मधील मजुरा सोबत घडला असून याबाबत अंबड औद्योगिक पोलीस ठाण्यामध्ये संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत उपलब्ध झालेले अधिक माहिती अशीही अंबर औद्योगिक वसाची जवळ असलेल्या घरकुल योजनेमध्ये राहणारे आणि मोल मोजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे मोहन राधाकृष्ण म्हस्के हे आज सकाळी आपल्या घराबाहेर खुर्ची टाकून बसले असताना या ठिकाणी हिंदू धर्मांतुन एक विशिष्ट धर्म स्वीकारावा यासाठी म्हणून ज्योती मोरे नावाची महिला आली आणि तिने शेजारी असलेल्या समाज मंदिरामध्ये प्रवचन चालू आहे म्हणून तुम्ही जा त्यासाठी तुम्हाला मी पैसे देते असे सांगितले. त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रवचन चालू होते आणि याप्रमाणे प्रवचनांमध्ये हिंदू धर्माच्या विरोधात प्रचार केला जात होता आणि एका विशिष्ट धर्माचे प्रभू हे किती चांगले आहेत त्यांच्या गुणगान केल्यानंतर किती फायदे होतात या स्वरूपाची माहिती दिली जात होती. यावेळी मस्के यांना धर्मांतर करा अशी माहिती देण्यात आली. त्या दृष्टिकोनातून त्यांनी धर्मांतर करावे यासाठी म्हणून प्रयत्न करण्यात आली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती भाजपा प्रवक्ते आणि औद्योगिक संघटनाचे अध्यक्ष प्रदीप पेशकर यांना दिली. त्यानंतर ही माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि विश्व हिंदू परिषद तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत पाऊल उचलली आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते श्रीकांत चौधरी विजय चव्हाण, गौरव पवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी हा धर्मांतराचा डाव आणून पडला त्यानंतर म्हस्के यांना घेऊन हे सर्व कार्यकर्ते अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले त्या ठिकाणी आकाश कांबळे, प्रियंका कल्याणपुरी गोस्वामी , रेखा गुलाब अमोद, ज्योती गुरुदेव मोरे राहणार सर्व अंबड या आरोपी विरोधात अंबड औद्योगिक क्षेत्रातील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याचा असून पुढील तपास पोलीस महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव या अधिक तपास करीत आहे.
आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती धर्मांतर करण्यासाठी म्हणून दबाव टाकला जात होता त्यानंतर हे लोन हळूहळू नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये देखील दिसून येत होते परंतु आता धर्मांतर करा हिंदू धर्म हा वाईट आहे या स्वरूपाचा अपप्रचार हा आता नाशिक शहरापर्यंत पोहोचला आहे हे दुर्दैवाची गोष्ट आहे. भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकर यांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी जी पावला उचलली आणि त्यानंतर झालेली पोलीस तक्रार यातून हा प्रकाराचा शहरी भागात जर वाढत असल्याचे देखील समोर येत आहे.
हिंदुस्थान समाचार
