पुणे, 27 नोव्हेंबर, (हिं.स.)दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडाला येरवडा पोलिसांनी अटक केली. समीर शब्बीर शेख (वय २७, रा. जयजवाननगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. शेख हा सराईत असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली होती.
‘मकोका’ कारवाईत न्यायालायने त्याला जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर झाल्यानंतर तो पुन्हा येरवडा भागात आला. त्याने दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्याची नुकतीच घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. शेख याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. पसार झालेला शेख हा लोहगाव भागात मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड यांनी खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून शेख याला पकडले. दहशत माजविणे, तसेच एकाबरोबर झालेल्या भांडणातून वाहनांची तोडफोड केल्याची कबुली त्याने दिली.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
