नाशिक, १८ डिसेंबर (हिं.स.) : घरात शिरून चोरट्यांनी रोकडसह मोबाईल चोरून नेल्याची घटना सदिच्छानगर भागात घडली. खिडकीतून हात घालून चोरट्यांनी दरवाजास लावलेली आतील कडी उघडून ही चोरी केली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुनवासी दिनानाथ विश्वकर्मा (रा.देवराम आव्हाड यांची चाळ,सदिच्छानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. विश्वकर्मा कुटूंबिय रात्री झोपी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून हात घालून दरवाजाची आतून लावलेली कडी उघडली. त्यानंतर घरात प्रवेश करून हॉलमधील कपाटातील रोकड व टेबलावर पडलेला मोबाईल असा सुमारे २६ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
