जळगाव, 15 जानेवारी (हिं.स.) लग्न करून द्या अशी मागणी करत करत असलेल्या वृद्ध वडिलांना स्वतःच्या मुलाने कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यात घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. आहे. रत्न तानसिंग कोळी (७३) असे मृत वृद्धाचे नाव आहे. यावल तालुक्यातील पिळोदा येथे रतन कोळी व त्याची पत्नी शुबाबाई कोळी आणि मुलगा देवानंद कोळी यांच्यासोबत वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे रविवारी १४ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास झोपलेले असतांना, मुलगा देवानंद याने माझे लग्न लावून द्या म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. वडिलांनी याकडे दुर्लक्ष केले असता, याचा राग डोक्यात घालत आरोपीने झोपलेल्या वृद्ध पित्यावर कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली. या घटनेने गावात खळबळ उडाली. यावेळी पतीचा खून झालेला पांगून पत्नी शुबाबाई यांनी एकच आक्रोश केला. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरोपी देवानंद कोळी याला अटक करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार
