जळगाव, 20 जानेवारी (हिं.स.) पाचोरा शहरातील स्टेट बँक कॉलनीत सकाळी दोन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील खिडकीचे गज कटरने तोडून घरातील कपाटाचे लॉकर तोडून पंधरा लाख रुपये किंमतीचे २३ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सोने व सात हजार रुपये रोख चोरी झाल्याची घटना घडली आहे. पोलीसांच्या माहितीनुसार तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा संशय आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील स्टेट बँक कॉलनीत रहिवासी दिनेश एकनाथ तावडे हे आपली पत्नी व मुलांसह घरातील पुढच्या रुममध्ये झोपलेले असताना रात्री दोन वाजेच्या दरम्यान तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील खिडकीचे गज घरातीच विज कनेक्शनचा फायदा घेत इलेक्ट्रिक कटरने खिडकीचे तीन लोखंडी गज कापून आत प्रवेश केला.घरातील कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील दिनेश एकनाथ तावडे व त्यांच्या पत्नीचे २३ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने व समोरच असलेले दिनेश तावडे यांचे सात हजार रुपये असलेले पाकीट घेऊन पसार झाले. दिनेश तावडे यांचे लहान मुले शाळेत जात असताना त्यांचे शाळेचे गणवेश शोधण्यासाठी तावडे त्या रुममध्ये गेल्यानंतर सदरचा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी स्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. दिनेश एकनाथ तावडे यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
