cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारे तिघे एका तासात जेरबंद
Crime

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारे तिघे एका तासात जेरबंद

CliQ INDIA
Last updated: February 27, 2026 6:31 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

लातूर, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने सतर्क असून प्रत्येक गुन्ह्यात तात्काळ कारवाई करण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्याच अनुषंगाने देवणी पोलीस ठाणे येथील पोलिसांनी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या तिघा आरोपींना अवघ्या एका तासाच्या आत ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुरनं. ४४/२०२६ अन्वये कलम १३७(२), ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथक नियुक्त करण्यात आले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या सूचनांनुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी जलद गतीने तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे खालील आरोपींची नावे निष्पन्न झाली :

1. कलीम हाकानी शेख (वय २० वर्षे)

2. अशपाक करीम शेख (वय २० वर्षे)

3. बिलाल खालेद कुरेशी (वय २५ वर्षे)

सर्व रा. उदगीर, ता. उदगीर

सदर आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीस त्यांच्या ताब्यातील स्काय ब्ल्यू रंगाच्या इटॉस चारचाकी वाहनातून छत्रपती संभाजीनगर दिशेने नेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ बीड, छत्रपती संभाजीनगर तसेच महामार्ग पोलीस यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला. बीड–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पाचोड टोलनाका येथे नाकाबंदी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.

दरम्यान महामार्ग सुरक्षा पथक, बीड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे यांनी संपर्क साधून आरोपी व पीडित मुलगी यांना गेवराई येथे ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

यानंतर देवणी पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोउपनि व-हाडे, सफौ सय्यद व महिला पोलीस अंमलदार गोपे यांना तात्काळ गेवराई येथे पाठविण्यात आले. त्यांनी आरोपी, त्यांचे वाहन व पीडित मुलगी यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी देवणी येथे आणले.

ही संपूर्ण कारवाई देवणी पोलीस ठाण्याचे सपोनि बी. एस. गायकवाड, पोउपनि व-हाडे, सफौ सय्यद व महिला पोलीस अंमलदार गोपे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयाने पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि व-हाडे करीत आहेत..

—————

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

You Might Also Like

जळगावात वाळूची बेकायदेशीर वाहतूक; ट्रॅक्टर-डंपर जप्त
लातूर – दुचाकी व खडीने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू
चाकूर : मतदारावर हल्ला; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : गुंड अभिजित बंडगरची तुरुंगात रवानगी
धुळ्यातील एनडीआरएफ पथकाची बोट बुडाली; जळगावच्या जवानासह तीन जण शहीद

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article रत्नागिरी : ‘ईठ्ठला’ नाटकावर बंदी घालण्याची मागणी
Next Article एअरटेल पेमेंट्स बँक रुपे ऑन-द-गो कार्डसाठी आणत आहे तत्काळ एनएफसी-बेस्ड बॅलन्स अपडेट
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?