मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.)। या वर्षी गणेशोत्सवाच्या तयारीत एक वेगळीच लहर आहे. परंपरेचा गाभा जपत, आधुनिकतेचा स्पर्श देणारी डब्ल्यूओएल३डी कंपनीची ३डी प्रिंटेड गणेश मूर्ती आता घराघरात पोहोचणार आहे.
डब्ल्यूओएल३डीच्या या उपक्रमामागे मुख्य उद्देश म्हणजे पारंपरिक श्रद्धा टिकवताना पर्यावरणपूरक आणि आधुनिक मूर्ती घराघरात पोहोचवणे. ही ८ इंचांखालील मूर्ती हलकी असून टिकाऊही आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकारलेल्या या मूर्तीच्या डिझाइनमध्ये परंपरेची जाणीव आणि आधुनिकतेचा फुलावा दिसून येतो.
या खास मूर्ती पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत – ऑफ व्हाईट, अँटिक गोल्ड, रस्टिक कॉपर, प्युअर कॉपर आणि शॅम्पेन गोल्ड. तसेच तीन विशेष डिझाइन्समुळे प्रत्येक घरात या बाप्पाचे स्वागत वेगळ्या अंदाजात करता येईल.
डब्ल्यूओएल३डीचे म्हणणे आहे की, “आमच्या या उपक्रमातून आम्ही परंपरा आणि नवकल्पना एकत्र आणून प्रत्येक घरातील गणेशोत्सव अधिक सुंदर, सुलभ आणि टिकाऊ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. या वर्षी आपल्या घरी बाप्पाचे स्वागत एका अशा रूपात करा, जे श्रद्धा टिकवेल आणि भविष्याकडे पाऊल उचलेल.”
या नवीन ३डी प्रिंटेड गणपती मूर्तीमुळे या वर्षीच्या गणेशोत्सवाला नवचैतन्य आणि पर्यावरणपूरकतेचा स्पर्श मिळणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
