cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > महिंद्राने अवघ्या १६ महिन्यांत गाठला १ लाख गाडी निर्मितीचा टप्पा
Business

महिंद्राने अवघ्या १६ महिन्यांत गाठला १ लाख गाडी निर्मितीचा टप्पा

CliQ INDIA
Last updated: October 7, 2023 7:37 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 7 ऑक्टोबर (हिं.स.) भारतातील गाड्या उत्पादनातील आघाडीची कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने नुकताच एक नवीन विक्रम केला. त्यांच्या नवीन बोलेरो मॅक्स पिक अप रेंज या गाडीला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या सोळा महिन्यात या गाडीने १ लाख गाडी निर्मितीचा टप्पा गाठला आहे. मालवाहतूक क्षेत्रातील हा एक विक्रमच आहे.

१० ऑगस्ट २०२२ रोजी महिंद्राने मॅक्स पिक अप सिटी ही गाडी आणली. मालवाहतुकीसाठी महिन्द्राला मिळणाऱ्या यशात या गाडीचे योगदान मोठे आहे. या गाडीपाठोपाठच कोणतीही कल्पना नसताना, कंपनीने एप्रिल २०२३ मध्ये अचानक वेगवेगळ्या मॉडेल्सच्या ८ गाड्या बाजारात आणल्या. वेगवेगळ्या पद्धतीचे आणि वजनाचे सामान वाहून नेणाऱ्या या गाड्या सिटी आणि एचडी या रेंजमधील होत्या.

कंपनीच्या या यशाबद्दल महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ नलिनीकांत गोल्लागुंटा म्हणतात, एवढ्या कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळणे ही ग्राहकांच्या आमच्यावर असलेल्या विश्वासाची एकप्रकारे पावतीच आहे. भारतातील परिस्थितीची योग्य माहिती असणे आणि त्याप्रमाणेच ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणे, हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. आणि आम्ही ते किती योग्य प्रकारे करतो आहोत, ते आम्हाला मिळणाऱ्या प्रतिसादातून समोर येते आहे. यापुढेही आम्ही अशाच प्रकारे ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवू, याची मला खात्री आहे. आगामी येणाऱ्या गाड्या या तांत्रिकदृष्ट्या ऍडव्हान्स असतीलच पण, त्या एकाच वेळी अनेक कामांसाठी वापरता येतील.

ऑल न्यू बोलेरो मॅक्स पिक अप ही गाडी प्रत्येक गोष्टीत इतर गाड्यांपेक्षा सरस ठरली आहे. यात ऍडव्हान्स कनेक्टिव्हिटी फीचर आहेत. या गाड्यांमध्ये ड्रायव्हरचा विचार करून त्याला अधिकाधिक सोयीस्कर कसे वाटेल, याप्रमाणे सीट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. दिसण्याची अडचण येऊ नये म्हणून दिव्यांची सोय करण्यात आली आहे. ही गाडी मालवाहतूक करणारी असल्याने सामानाला ऐसपैस जागा मिळेल, असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच 7R16 हे मजबूत टायर या गाडीला असून त्यामुळे कुठेही अडथळा येत नाही. या गाड्यांमध्ये सिटी आणि एचडी या दोन रेंज असून ग्राहकांच्या गरजेप्रमाणे या दोन्ही गाड्या डिझेल तसेच सीएनजी या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत.

ही गाडी बाजारात आल्यापासून आतापर्यंत महिंद्राच्या जवळपास २ लाखांहून अधिक गाड्यांची विक्री झाली आहे. भारतातील परिस्थितीचा अभ्यास करून निर्माण करण्यात आलेल्या या गाड्यांना म्हणूनच मोठ्या प्रमाणात मागणी असते. देशातील अगदी दुर्गम भागात जाण्याची देखील या गाडीची क्षमता आहे, त्यामुळेच या गाड्या आपल्या मालवाहतुकीचा कणा आहेत, असे म्हटल्यास काही चुकीचे ठरणार नाही.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

एप्रिलमध्ये भारतातील किरकोळ महागाई दर 3.48 टक्क्यांवर पोहोचला.
अमृतांजन हेल्थकेअरने सलग चौथ्या वर्षी पंढरपूरवारीतील वारक-यांना दिली आरोग्यसेवा
टाटा एआयएने पॉलिसीधारकांसाठी 1,465 कोटींचा आतापर्यंतचा सर्वाधिक बोनस केला घोषित | BulletsIn
वनप्लस नॉर्ड ५ आणि नॉर्ड सीई ५ उद्या भारतात लाँच| BulletsIn
अदानी पॉवर बिहारमध्ये वीज प्रकल्पासाठी ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article आशियाई स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय कबड्डी संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Next Article कर्नाटकात समान पाणी वितरणासाठी स्काडा प्रणालीचा यशस्वी प्रयोग
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?