मुंबई, 26 नोव्हेंबर, (हिं.स.) – गोल्डमेडल इलेक्ट्रिकल्स हा भारतातील आघाडीच्या फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स (FMEG) ब्रँड आहे. कंपनीने आता ऑक्सीरिच एअर प्युरिफायिंग ब्लेडलेस फॅन आणला आहे. हा फॅन स्वच्छ हवेचा आनंद देतो आणि समाधानही देतो. याचे डिझाइन आधुनिक आहे. त्याला प्रगत तंत्रज्ञानाची जोड आहे. त्यामुळे देऊन तुमचे राहणीमान उंचावते. केवळ हवा शुद्ध देत नाही तर तुमची जागाही थंड करते, स्वच्छ, आरोग्यदायी आणि अधिक आरामदायक वातावरणही निर्माण करते.
भारतातील अनेक शहरांमध्ये गंभीर वायू प्रदूषण आणि हवेची गुणवत्ता ढासळत असताना, लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हवा शुद्धीकरण आवश्यक बनले आहे. नवीन ऑक्सीरिच एअर प्युरिफायिंग ब्लेडलेस फॅन हे एक शक्तिशाली एअर प्युरिफायर सोल्यूशन आहे जे खोलीतील हवेची गुणवत्ता रिअल टाइम दाखवते आणि पंखा चुंबकीय रिमोट कंट्रोल आणि एलईडी टच पॅनेलद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. गोल्डमेडल इलेक्ट्रिकल्सचे गुणवत्ता आणि नावीन्यपूर्ण उपकरणे देण्यासाठी कटिबद्ध आहे. ही कटिबद्धता नवीन स्लीक आणि सुरक्षित ब्लेडलेस डिझाइनमधून दिसून येते. ज्यांना आरामदायी वातावरण हवे आहे आणि निरोगी आरोग्य हवे आहे त्यांच्यासाठी हे उपकरण असणे आवश्यक आहे.
ऑक्सिरिच एअर प्युरिफायिंग ब्लेडलेस फॅनवर टिप्पणी करताना, गोल्डमेडल इलेक्ट्रिकल्सचे संचालक बिशन जैन म्हणाले की, “गोल्डमेडल इलेक्ट्रिकल्समध्ये आम्ही नाविन्यपूर्ण पंखे तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतो. त्याद्वारे आरामदायी वातावरण मिळते आणि आरोग्यही सुधारते. भारतात वायू प्रदूषणाची पातळी वाढत आहे. या काळात आमचा प्रगत ऑक्सिरिच एअर प्युरिफायिंग ब्लेडलेस फॅन तुमच्या राहण्याची जागा शुद्ध करतो आणि थंड करतो. ही काळाची गरज आहे. चुंबकीय रिमोट आणि साध्या एलईडी टच पॅनेलसह हा फॅन नियंत्रित करणे सोपे आहे. शिवाय, सर्वोत्तम हवेची गुणवत्ता सुधारण्यासह त्यातील लायटिंगमुळे खोलीत एका प्रकारचे सुंदर वातावरण तयार होते.
ऑक्सीरिच एअर प्युरिफायिंग ब्लेडलेस फॅनची इतर वैशिष्ट्ये :
पंख्याचा प्रकार: याला पारंपरिक फॅन ब्लेड नाहीत. हा ब्लेडलेस फॅन आहे. त्यात शुद्धिकरणाचे तंत्रज्ञान आहे. या नाविन्यपूर्ण कुलिंग उपकरणातून ताजीतवानी आणि शुद्ध हवा मिळते. ब्लेडलेस फॅनमुळे हे उपकरण सुरक्षित ठरते.
रिमोट कंट्रोल: मॅग्नेटिक रिमोट स्लीक आहे. शिवाय युजर-फ्रेंडली आहे. हा रिमोट फॅनच्या आधुनिक डिझाइनला पूरक आहे. त्याचे स्टायलिश, छोटे रूप आणि चुंबकीय वैशिष्ट्य आपल्याला फॅनच्या सेटिंग्ज नियंत्रित करण्याची आवश्यकता असताना संचयित करणे आणि स्टोअर करते.
नियंत्रण पॅनेल: फॅनचे एलईडी टच कंट्रोल पॅनल वापरण्यासाठी सोपे
दिशा बदण्याची क्षमता : पंखा 30, 60, 90 आणि 120 अंशांसह विविध दिशेला सेट करता येतो. त्यामुळे तुम्हाला तुमची आवश्यकतेनुसार आणि तुमच्या जागेच्या मांडणीनुसार हवेच्या प्रवाहाची दिशा निश्चित करता येते.
मोड: पंखा विविध ऑपरेटिंग मोड्ससह सुसज्ज आहे, थंड आणि आरामदायी अनुभवासाठी असे डिझाइन केलेले आहे.
प्रकाश: फॅनमध्ये सुंदर असा लाइटही आहे. त्यामुळे केवळ फॅनचे सौंदर्य वाढत नाही तर तुमच्या रुमचे सौंदर्यही खुलवते.
बंद करण्यासाठी टाइमर : फॅनमध्ये प्रोग्राम सेट करता येतो. त्यात ऑफ टायमरचे वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे तुम्हाला पंख्याचा टायमिंग सेट करून नंतर ऑटोमॅटिक बंद करता येतो.
दिशा सेट करणे : फॅनचा अँगल तुम्हाला हवा तसा सेट करता येतो, हे याचे वैशिष्ट्य आहे. १५ अंशांपर्यंत तो झुकू शकतो. आपण पंखाच्या डोक्याची उभी बाजू सेट करू शकता.
हे उत्पादन ऑनलाइन तसेच किरकोळ स्टोअरमध्ये Rs. 35,999/- रुपयांना उपलब्ध आहे. ऑक्सिरिच एअर प्युरिफायिंग ब्लेडलेस फॅनवर दोन वर्षांची वॉरंटीही मिळते.
हिंदुस्थान समाचार
