cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > अक्झो नोबेल इंडियाच्या अधिग्रहणाची प्रक्रिया जेएसडब्ल्यू पेंट्सकडून पूर्ण
Business

अक्झो नोबेल इंडियाच्या अधिग्रहणाची प्रक्रिया जेएसडब्ल्यू पेंट्सकडून पूर्ण

CliQ INDIA
Last updated: December 12, 2025 6:32 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 11 डिसेंबर (हिं.स.)। जेएसडब्ल्यू पेंट्स लिमिटेडने (“जेएसडब्ल्यू पेंट्स”) आज अक्झो नोबेल एन.व्ही. आणि तिच्या संलग्न कंपन्यांकडून अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड (“एएनआयएल”) मधील प्रमुख 60.76% भागभांडवल संपादित केले. जेएसडब्ल्यू पेंट्सने खुल्या प्रस्तावाची यशस्वी पूर्तता करून ‘एएनआयएल’च्या सार्वजनिक भागधारकांकडून आधीच 0.44% भागभांडवल संपादित केले आहे. आजच्या संपादनानंतर जेएसडब्ल्यूचा हिस्सा 61.2% झाला आहे.

जेएसडब्ल्यू पेंट्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी पेंट्स कंपनी आहे आणि ती 23 अब्ज डॉलर्सच्या जेएसडब्ल्यू समूहाचा एक भाग आहे. जेएसडब्ल्यू समूह हा भारतातील एक अग्रगण्य समूह असून पोलाद, सिमेंट, ऊर्जा, पायाभूत सुविधा, ऑटोमोटिव्ह आणि पेंट्स यांसारख्या विविध B2B आणि B2C क्षेत्रांमध्ये विस्तार झाला आहे. भारतातील सजावटीच्या आणि औद्योगिक पेंट्स क्षेत्रातील अनिल (ANIL) ही एक अग्रगण्य कंपनी आहे. आणि नेदरलँड्समध्ये मुख्यालय असलेल्या, सजावटीच्या पेंट्स आणि औद्योगिक कोटिंग्समधील जागतिक अग्रणी असलेल्या अक्झो नोबेलचा ती एक भाग होती.

या व्यवहारामुळे या क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांमध्ये जेएसडब्ल्यू पेंट्सची गणना होईल. विशेष म्हणजे, आगामी वर्षांमध्ये या क्षेत्रात भरीव वाढ होण्याची अपेक्षा आहे.

जेएसडब्ल्यू ग्रुपचे चेअरमन श्री. सज्जन जिंदाल म्हणाले, “अक्झोनोबेल इंडिया टीमचे जेएसडब्ल्यू परिवारात स्वागत करताना मला आनंद होत आहे. भारताकडे विश्वासार्ह आणि जागतिक दर्जाचे पेंट्स तसेच कोटिंग्ज असायला हवेत, असा आमचा विश्वास आहे. ड्युलक्सच्या माध्यमातून, देशभरातील घरे आणि उद्योगांपर्यंत जागतिक दर्जाची उत्पादने पोहोचवण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. एकत्रितपणे आमच्या ग्राहकांसाठी आणि भारतासाठी एक मजबूत, उज्ज्वल आणि अधिक रंगीत भविष्य घडवण्याची येथे एक अविश्वसनीय संधी आहे.”

जेएसडब्ल्यू पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पार्थ जिंदाल म्हणाले, “अक्झो नोबेल इंडियाचे जेएसडब्ल्यू परिवारात स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारतातील पेंट्स आणि कोटिंग्ज बाजारपेठेतील सर्वात मोठ्या अधिग्रहणांपैकी हे एक असल्याने ही ऐतिहासिक घटना आहे. कर्मचारी, ग्राहक आणि भागीदार यांचा समावेश असलेल्या अक्झो नोबेल इंडिया परिवारासोबत आम्ही भविष्याच्या दृष्टीने पेंट कंपनी उभारण्याचे ध्येय बाळगतो. ड्युलक्सच्या जादूने आणि जेएसडब्ल्यू पेंट्सच्या विचारप्रक्रियेने, आम्ही ग्राहकांना आनंदित करण्यास तसेच आमच्या भागधारकांसाठी चिरस्थायी मूल्य निर्माण करण्यास उत्सुक आहोत.”

अक्झोनोबेलचे सीईओ श्री. ग्रेग पौक्स-गिलाउम म्हणाले, “आमच्या धोरणात्मक उद्दिष्टांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या आणि अक्झोनोबेलला दीर्घकालीन मूल्य निर्मितीसाठी सज्ज करण्याच्या दिशेने आजचा हा करार म्हणजे एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारतातील आमच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. देशातील वेगाने वाढणाऱ्या पेंट्स आणि कोटिंग्जच्या बाजारपेठेतील एक मजबूत आणि वचनबद्ध भागीदार असलेल्या जेएसडब्ल्यूकडे हा व्यवसाय हस्तांतरित होत असल्याचे पाहून आम्हाला आनंद होतो आहे.”

मॉर्गन स्टॅनलीने या व्यवहारात जेएसडब्ल्यू पेंट्ससाठी विशेष वित्तीय सल्लागार म्हणून काम केले. खेतान अँड कंपनीने यात कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले. तर डेलॉइटने वित्तीय आणि करविषयक ड्यू डिलिजन्स सल्लागार म्हणून काम केले.

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

ॲपलने रिटेल प्रोत्साहन योजना मागे घेतल्याने आयफोन १५ आणि १६ च्या किमती वाढण्याची शक्यता
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर
जानेवारीतील उच्चांकानंतर सोने-चांदी कोसळले; बाजारातील घबराट, नफावसुली आणि डॉलरच्या मागणीने बदलले चित्र.
‘बीलाईव्ह’ कडून पुणे शहरात ५ हजार ई-दुचाकी तैनात होणार
पुढील आठवड्यात सात नवीन आयपीओ होणार खुले; चार कंपन्यांची लिस्टिंग

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article जळगाव – नायब तहसीलदारांची दुचाकी चोरी; तिघे संशयित गजाआड
Next Article विधानसभेत हैद्राबाद इनामे आणि रोख अनुदाने रद्द करणे (सुधारणा) एकमताने विधेयक संमत !
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?