मुंबई, 14 ऑक्टोबर : शेफलर इंडिया लिमिटेड ही औद्योगिक आणि वाहन क्षेत्रातील आघाडीची पुरवठादार कंपनी असून, कंपनीने ऑक्टोबर २०१९ मध्ये रेप्क्सपर्ट मोबाइल ट्रेनिंग सेंटर सुरू केले होते. कंपनीने आज खास व्यावसायिक वाहनांसाठी रेप्क्सपर्ट टेक्निकल ट्रेनिंग व्हॅन लाँच करत असल्याची घोषणा केली. व्यावसायिक वाहन क्षेत्रातील हा पहिलाच असा उपक्रम असून यामध्ये परिवाहन, चेसिस सिस्टिम आणि वेगाने पुढे येणाऱ्या ऑटोमोटिव्ह अॅप्लिकेशन्सचे प्रशिक्षण यामध्ये दिले जाणार आहे.
रेप्क्सपर्टची ब्रँडेड ट्रेनिंग व्हॅन ही छत्तीसगढ, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून प्रवास करण्यास तयारआहे. वाहन क्षेत्रातील व्यावसायिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना आणखी कुशल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे शेफलरच्या या मोहिमेतून दिसून येते. यामुळे त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचेही ज्ञान मिळणार आहे.
शेफलर इंडियाच्या ऑटोमोटिव्ह अफ्टरमार्केट विभागाचे अध्यक्ष देबाशिष सतपती म्हणाले की, व्यावसायिक वाहन क्षेत्र हे भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यातून देशाच्या आर्थिक स्थिती दिसून येते. या क्षेत्रासाठी खास ट्रेनिंग व्हॅन सुरू करून आम्ही केवळ कौशल्य विकासावर भर देणार नाही तर व्यावसायिक वाहने क्षेत्रातील आव्हानांचीही माहिती देणार आहोत. आपल्या तंत्रज्ञांना सध्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती हवी आणि ते उद्योगातील बदलात सदैव पुढे असायला हवे. हा उपक्रम म्हणजे शेफलरच्या वाहन उद्योगात तज्ज्ञ निर्माण करण्याच्या कटिबद्धतेचे मूर्त रूप आहे.
या प्रशिक्षण व्हॅनमधील अभ्यासक्रमात पुढील घटकांचा समावेश आहे –
● क्लच फिटकरताना क्लच आणि फ्लायव्हीलचे मेकॅनिजम कसे हाताळावे
● इन्स्टॉल केल्यानंतर क्लच रिलिज चेकिंग कसे करावे
● क्लच रिलिजसाठी हायड्रोलिक प्रेसचा वापर कसा करावा
● स्पेशल टूलद्वारे वैज्ञानिक दृष्ट्या क्लच बसवण्याची प्रक्रिया
● डायफ्रेम आणि कॉईल टाइफ कव्हर असेंब्लीमधील फरक
● विशेष टूल्सने युनिव्हर्सल जॉइंट क्रॉस फिट करणे
● व्यावसायिक वाहनांसाठी लागणाऱ्या ल्युब्रिकंट्सची माहिती
पॅसेंजर कार क्षेत्रातील मोहिमेत यश मिळाल्यानंतर त्यावर आधारीत तयार करण्यात आलेल्या या नव्या मोहिमेत शेफलर इंडियाचा ऑटोमोटिव्ही आफ्टरमार्केट विभाग टेक्निशिअन आणि मेकॅनिक्सला प्रशिक्षणाद्वारे सक्षम करत राहणार आहे. आधीच्या मोहिमांमधून मिळालेल्या अभिप्रायांनंतर यात अनेत बदल करण्यात आले आहेत. या व्हॅनमध्ये खास महत्त्वाच्या उत्पादन क्षेत्राचा माहिती असेल.
शेफलर इंडिया नवी मोहीम सुरू करण्यासाठी कटिबद्ध आहे. आतापर्यंत १३० शहरांमध्ये ५००० हून अधिक मेकॅनिक्सला या मोहिमेत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातून तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि ग्राऊंड लेव्हल ट्रेनिंग देण्यात शेफलरची कटिबद्धता दिसून येते.
ऑक्टोबर २०१९ मध्ये शेफलर इंडियाने पहिले मोबाइल ट्रेनिंग सेंटर सुरू करून या मोहिमेला सुरूवात केली होती. प्रत्येक कॅम्पेनच्या माध्यमातून हेच दिसून आले आहे की, ऑटोमोटिव्ह क्षेत्रात कौशल्य विकास करणे आणि माहितीची देवाण घेवाण करण्यासा शेफरल वचनबद्ध आहे.
शेफलर समूह – आम्ही चळवळ उभी करतो
शेफलर समुहाने गेल्या ७५ वर्षांमध्ये अनेक नवे तथा अभूतपूर्व नवीन गोष्टी आणल्या आहेत आणि विकसित केल्या आहेत. तंत्रज्ञानातील नाविन्यता, उत्पादन आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी सेवा, कार्बन उत्सर्जनविरहित वाहतूक, चेसिस सोल्युशन्स, इंडस्ट्री ४.०, डिजिटलाझेशन आणि अक्षय उर्जा यात कंपनी एक विश्वासू भागीदार आहे. कंपनी ड्राइव्हट्रेन आणि चेसिस अॅप्लिकेशन्ससाठी विविध प्रकारचे उच्च दर्जाचे उत्पादने तयार करते. याशिवाय रोलिंग आणि प्लेन बेअरिंगचे सोल्युशन्सही अनेक उद्योगांना पुरवते. शेफलर समूहाने २०२२ मध्ये १५.८ अब्ज युरोची विक्री केली आहे. शेफलर समूहाचे ८४ हजाराहून अधिक कर्मचारी असून जगातील सर्वांत मोठी कुटुंबाच्या मालकीची कंपनी आहे. २०२२ मध्ये कंपनीकडे १२५० पेटंट असून डीपीएमए (जर्मन पेटेंट अँड ट्रेडमार्क ऑफिसच्या)नुसार शेफलर ही जर्मनीतील चौथी सर्वांत इनोव्हेटिव्ह कंपनी आहे.
