cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > महिंद्रातर्फे XUV 3XO श्रेणीमध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन सादर; 13.89 लाख रु. पासून सुरुवात
Business

महिंद्रातर्फे XUV 3XO श्रेणीमध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन सादर; 13.89 लाख रु. पासून सुरुवात

CliQ INDIA
Last updated: January 9, 2026 6:32 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 08 जानेवारी (हिं.स.)। भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडतर्फे आज XUV 3XO EV चे अनावरण करण्यात आले असून त्याची प्रारंभिक किंमत 13.89 लाख रु. आहे. चोखंदळ ग्राहकांच्या आकांक्षा आणि बदलत्या विशेष गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आलेल्या या XUV 3XO EV मध्ये शहरी डिझाइन, कार्यक्षमता, सुरक्षितता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा परिपूर्ण समतोल साधण्यात आला आहे.

या वाहनाचा समकालीन आणि ठसठशीत लूक रस्त्यावर आत्मविश्वास निर्माण करतो आणि ही ईव्ही XUV 3XO कुटुंबाचा भाग असल्याची त्वरित ओळख पटते. अंतर्गत भागात आधुनिक सौंदर्यशास्त्र आणि प्रीमियम वातावरण यांचा संगम असून, प्रत्येक प्रवासात आराम देण्यासाठी ते डिझाइन करण्यात आले आहे. आकर्षक डिझाइनसोबतच, XUV 3XO EV व्यावहारिक मालकीचा अनुभव देत असून ग्राहकांसाठी किफायतशीर पर्याय ठरणार आहे.

एप्रिल 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या XUV 3XO ने या विभागामधील आघाडीची अनेक वैशिष्ट्ये सादर करत सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. सादर झाल्यापासून आतापर्यंत जवळपास 1.8 लाख विक्रीचा टप्पा गाठत या मॉडेलला प्रचंड यश मिळाले आहे. XUV 3XO EV पण याच भक्कम पायावर आधारित असून शहरांतर्गत प्रवासासाठी वाहनाचा वापर करणाऱ्या आणि पुढच्या काळाचे स्मार्ट पाऊल म्हणून इलेक्ट्रिक एसयूव्ही हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आली आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोल्लागुंटा म्हणाले, “XUV 3XO ने आकांक्षा आणि सुलभता यांना एकत्र आणत नियमच बदलून टाकले. दिवसेंदिवस आपल्या दैनंदिन जीवनात स्वाभाविकपणे ईव्ही गाडी असावी अशी अपेक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी XUV 3XO EV च्या माध्यमातून आम्ही हीच यशस्वी संकल्पना इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये विस्तारत आहोत. दळणवळणाच्या रोजच्या गरजा विश्वासार्हपणे पूर्ण करेल हे सुनिश्चित करत XUV 3XO EV ची अभियांत्रिकी प्रत्यक्ष वापर पद्धती लक्षात घेऊन करण्यात आली आहे. तत्काळ इलेक्ट्रिक परफॉर्मन्ससोबतच शहरातील ड्रायव्हिंगसाठी आत्मविश्वास आणि सहजता देणारे पॅकेज यामध्ये एकत्र आले आहे.”

प्रमुख वैशिष्ट्ये:

जागा आणि आराम – प्रशस्त डिझाइन, प्रत्येक प्रवासात उत्कृष्ट आराम. ड्युअल झोन एसी, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, पॅनोरॅमिक सनरूफ, पॅसिव्ह कीलेस एंट्री (PKE), 6-वे अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, 60:40 रिअर सीट्स.

थ्रिल आणि मनोरंजन – सेगमेंटमधील सर्वात जलद – फक्त 8.3 सेकंदात 0-100 km/h, 310 Nm टॉर्क आणि 110 kW पॉवर. फन, फास्ट, फिअरलेस असे मल्टी ड्राइव्ह मोड्स. ट्विन HD इन्फोटेनमेंट आणि पूर्णपणे डिजिटल क्लस्टर, डॉल्बी अ‍ॅटमॉससह 7-स्पीकर हार्मन कार्डन ऑडिओ.

तंत्रज्ञान आणि सुरक्षितता –80 हून अधिक कनेक्टेड कार वैशिष्ट्यांसह अ‍ॅड्रेनॉक्स, रिमोट व्हेईकल कंट्रोल, व्हेईकल स्टेटस मॉनिटरिंग, ट्रिप समरी, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी आणि इन-कार अ‍ॅप्स सपोर्ट. लेव्हल 2 ADAS – अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, स्मार्ट पायलट असिस्ट, ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग इत्यादी. 360-डिग्री सराउंड व्ह्यू सिस्टीम, 6 एअरबॅग्स, 4 डिस्क ब्रेक्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमसह 35 स्टँडर्ड सेफ्टी वैशिष्ट्ये.

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

आरबीआयची नवी चेक क्लिअरन्स प्रणाली झाली लागू
सेबीची कारवाई; अमेरिकन ट्रेडिंग कंपनी ‘जेन स्ट्रीट’ला भारतीय शेअर बाजारात प्रवेशबंदी | BulletsIn
टाटा हॅरियर व सफारी पेट्रोल आवृत्त्या ९ डिसेंबरला होणार लाँच
यामाहाची नवी FZ Rave आणि XSR 155 बाइक भारतात लॉंच
29व्या संख्याशास्त्र परिषदेत डिजिटल उत्पादनांचे सादरीकरण

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नाशिक : विविध ठिकाणी चोरीला गेलेले कोट्यावधी रुपयांचे मोबाईल मूळ मालकांना परत
Next Article रिल्स स्टार अथर्व सुदामेला पीएमपीने 50 हजारांचा दंडासह बजावली तिसरी नोटीस
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?