cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > गोदरेज प्रॉपर्टीजने हैदराबाद येथील 5 एकर जमीन खरेदीसाठी लावली सर्वोच्च बोली
Business

गोदरेज प्रॉपर्टीजने हैदराबाद येथील 5 एकर जमीन खरेदीसाठी लावली सर्वोच्च बोली

CliQ INDIA
Last updated: December 3, 2025 6:33 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

हैदराबाद, 2 डिसेंबर (हिं.स.)। भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकासक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) ने हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या (एचएमडीए) ई-लिलावात कोकापेटमधील निओपोलिस परिसरातील सुमारे 5 एकर प्राइम भूखंडासाठी सर्वाधिक बोली लावली आहे. एमएसटीसी लिमिटेडच्या ई-टेंडरिंग पोर्टलवरील या ई-लिलावात जीपीएल सर्वोच्च बोलीदार ठरल्याची माहिती कंपनीने दिली आहे. पुढील शासकीय प्रक्रियेनंतर एचएमडीए तर्फे जमीनवाटपाचे पत्र जारी होणार आहे.

या महत्त्वाच्या भूखंडावर कंपनी प्रीमियम निवासी प्रकल्प विकसित करणार असून यात अंदाजे 2.5 दशलक्ष चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पातून जवळपास 4,150 कोटी रुपयांच्या महसूल क्षमतेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वेगाने विकसित होत असलेला निओपोलिस परिसर, फायनान्शियल डीस्ट्रीक्ट व एचआयटीईसी सिटीची जवळीक, आधुनिक पायाभूत सुविधा व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळा, आरोग्यसेवा व रिटेल सुविधांमुळे हैदराबादमधील सर्वाधिक मागणी असलेल्या निवासी मायक्रो-मार्केट्सपैकी एक बनला आहे. उच्च उत्पन्न गटातील घरखरेदीदारांकडून वाढत्या मागणीमुळे या भागात हैदराबादमधील सर्वाधिक जमीनदर आणि प्रकल्पमूल्यांकन होत आहे.

या आधी ऑगस्ट 2025 मध्ये कुकटपल्ली येथे 7.825 एकर जमीन खरेदी केल्यानंतर, कोकापेटमधील या लिलावात मिळवलेले यश जीपीएलच्या हैदराबादमधील उपस्थितीला अधिक बळकट करते. कोकापेटमधील गोदरेज मॅडिसन अव्हेन्यू व राजेंद्रनगर येथील गोदरेज रीगल पॅव्हिलियन प्रकल्पांच्या यशानंतर हा पुढील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. 2025 वर्षात हैदराबाद हे जीपीएलसाठी सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक ठरले असून कंपनीने येथे 2,600 कोटी रुपयांहून अधिक विक्री नोंदवली आहे. यामुळे शहरातील निवासस्थानांच्या मजबूत मागणीसह या बाजारपेठेवरील कंपनीचा वाढता धोरणात्मक भर स्पष्ट दिसतो.

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे यांनी सांगितले की, हैदराबादमधील सक्षम पायाभूत सुविधा वाढ आणि गुणवत्तापूर्ण निवासस्थानांची सातत्यपूर्ण मागणी हे शहराच्या दीर्घकालीन वाढीचे संकेत आहेत. या उच्च-संभाव्य बाजारपेठेत वेगवेगळ्या धोरणात्मक खरेदी आणि विशिष्ट प्रकल्पांतर्गत उपस्थिती वाढवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, विचारपूर्वक नियोजन, उत्कृष्ट रचना आणि ग्राहक-केंद्रित सुविधांसह प्रकल्प विकसित करून घरखरेदीदारांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे हे कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

सेठ जी एस मेडिकल कॉलेज, किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलची पीरामल फाउंडेशनसोबत भागीदारी
ॲपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे
टेस्लाचा गुरुग्राममध्ये विस्तार – Hindusthan Samachar Marathi
गोदरेज लॉक्सची १४ टक्के वाढीसह उल्लेखनीय प्रगती
रियलमी P4 लाइट 5G भारतात लॉन्च; 7000mAh बॅटरीसह दमदार एंट्री

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पुणे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात ‘संगीतमय तिकीटे’ प्रदर्शन
Next Article पुणे : भोरमध्ये आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?