नवीन राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध करुन इंधनावरील खर्च कमी करणे तसेच शेतीसाठी सेंद्रीय खताचे व्यवस्थापन करणे, हा उद्देश असून या योजनेंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना रु.14 हजार350/- तर अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना रु.22 हजार तसेच शौचालय जोडणीसाठी रु.1 हजार 600 प्रति लाभार्थी याप्रमाणे अनुदान दिले जाते.
राज्य पुरस्कृत योजना
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील)
योजनेचा उददेश :-
आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) या सिंचनप्रधान योजना कृषी विभाग, जिल्हा परिषद ठाणे या विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत खालील देय बाबी अंतर्भत असून त्यांची उच्चतम अनुदान मर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
नवीन विहीर- रु. 2 लाख 50 हजार, जुनी विहीर दुरुस्ती- रु.50 हजार, ईनवेल बोअरींग- रु. 20 हजार, वीज जोडणी आकार- रु.10 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण- रु. 1 लाख, सूक्ष्म सिंचन संच अ) ठिबक संच – रु. 50 हजार, ब) तुषार संच – रु. 25 हजार, परसबाग – रु. 500/-, पंप संच (डिझेल/ विदयुत) – रु. 20 हजार (10 अश्वशक्ती पर्यंत), पीव्हीसी/ एचडीपीई पाईप – रु.30 हजार.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना खालील तीन पॅकेज पैकी एकाच पॅकेजचा लाभ अनुज्ञेय राहील…
1) नवीन विहीर पॅकेज – नवीन विहीर वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, पंपसंच, पीव्हीसी पाईप, परसबाग व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग इ.बाबी देय आहेत.
2) जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज – जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, पंपसंच, पीव्हीसी पाईप, परसबाग व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग इ.बाबी देय आहेत.
3) शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज – शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, पंपसंच, पीव्हीसी पाईप, परसबाग इ.
लाभार्थी पात्रतेचे निकष :-
Ø बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना(क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जमाती शेतकरी असला पाहिजे.
Ø नवीन विहिरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्याकडे त्यांच्या स्वत:च्या नावे किमान 0.40 हेक्टर व नवीन विहीर ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबीसाठी किमान 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.
Ø शेतकऱ्याच्या नावे जमीनधारणेचा 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे. (नगरपालिका व महानगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राबाहेरील)
Ø लाभार्थ्यांकडे स्वत:चे नावे बँक खाते आधारकार्ड असणे व हे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
Ø या योजनेंतर्गत कमाल शेतजमिनीची अट 6.00 हेक्टर आहे.
Ø दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) यादीत अंतर्भूत शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट राहणार नाही. दारिद्रयरेषेखालील नसलेले परंतु ज्यांचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.1 लाख 50 हजार च्या मर्यादेत असावे. प्रस्तावित नवीन विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असावी.
Ø लाभार्थीस योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (विशेष घटक योजना)
योजनेचा उद्देश :-
अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही सिंचनप्रधान योजना कृषी विभाग, जिल्हा परिषद ठाणे या विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येते. सदर योजनांर्गत खालील देय बाबी अंतर्भत असून त्यांची उच्चतम अनुदान मर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
नवीन विहीर- रु. 2 लाख 50 हजार, जूनी विहीर दुरुस्ती- रु.50 हजार, ईनवेल बोअरिंग- रु. 20 हजार, वीज जोडणी आकार- रु.10 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण- रु. 1 लाख, सूक्ष्म सिंचन संच अ) ठिबक संच – रु. 50 हजार, ब) तुषार सिंचन- रु. 25 हजार, पंप संच – रु. 20 हजार (10 अश्वशक्ती पर्यंत).
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना खालील तीन पॅकेज पैकी एकाच पॅकेजचा लाभ अनुज्ञेय राहील…
1) नवीन विहीर पॅकेज :- नवीन विहीर वीज जोडणी आकार,सूक्ष्म सिंचन संच,पंपसंच,पीव्हीसी पाईप, परसबाग व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग इ.बाबी देय आहेत.
2) जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज :-जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, पंप संच, पीव्हीसी पाईप, परसबाग व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग इ.बाबी देय आहेत.
3)शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज :- शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, पंपसंच, पीव्हीसी पाईप,परसबाग इ.
लाभार्थी पात्रतेचे निकष :-
Ø डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकरी असला पाहिजे.
Ø नवीन विहिरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्याकडे त्यांच्या स्वत:च्या नावे किमान 0.40 हेक्टर व नवीन विहीर ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबीसाठी किमान 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.
Ø शेतकऱ्याच्या नावे जमीनधारणेचा 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे.(नगरपालिका व महानगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राबाहेरील)
Ø लाभार्थ्यांकडे स्वत:चे नावे बँक खाते आधारकार्ड असणे व हे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
Ø या योजनेंतर्गत कमाल शेतजमिनीची अट 6.00 हेक्टर आहे.
Ø दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) यादीत अंतर्भूत शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट राहणार नाही. दारिद्रयरेषेखालील नसलेले परंतु ज्यांचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.1 लाख 50 हजार चे मर्यादेत असावे. प्रस्तावित नवीन विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असावी.
Ø लाभार्थीस योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे .
या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन पध्दतीने केलेला अर्ज व प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह कृषी अधिकारी (विशेष घटक योजना), पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा व शासन अनुदानातील योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी श्रीमती सारिका शेलार यांनी केले आहे.
मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे
