cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > सध्याच्या आयपीएल फॉरमॅटमुळे बीसीसीआय, फ्रँचायझींना दरवर्षी २४०० कोटी रुपयांचे नुकसान- ललित मोदी
Sports

सध्याच्या आयपीएल फॉरमॅटमुळे बीसीसीआय, फ्रँचायझींना दरवर्षी २४०० कोटी रुपयांचे नुकसान- ललित मोदी

CliQ INDIA
Last updated: April 8, 2026 6:37 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE
सध्याच्या आयपीएल फॉरमॅटमुळे बीसीसीआय, फ्रँचायझींना दरवर्षी २४०० कोटी रुपयांचे नुकसान- ललित मोदी

मुंबई, 07 एप्रिल (हिं.स.)।आयपीएलच्या माजी आयुक्त ललित मोदी यांनी सांगितले की, सध्याच्या आयपीएल फॉरमॅटमुळे बीसीसीआय आणि फ्रँचायझींना प्रत्येक हंगामात सुमारे 2,400 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यांच्या मते, कमी सामने हे याचे सर्वात मोठे कारण आहे. ते म्हणाले, आम्ही जे विकले होते, ते हे नाही.

ललित मोदींनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीला प्रत्येक संघाने एकमेकांविरुद्ध दोनदा खेळण्याची योजना होती. 2022 मध्ये 10 संघ असताना 90 लीग सामने आणि चार नॉकआउट सामने झाले असते. मात्र, आयपीएलने होम-अँड-अवे प्रणाली बदलून केवळ 74 सामने ठेवले. यामुळे फ्रँचायझींना नुकसान होत आहे. आम्ही जे विकले होते, ते हे नाही. ते म्हणाले, प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 50% आणि उर्वरित 50% संघांमध्ये वाटले जाते. यामुळे संघांना 20 सामन्यांचे नुकसान होत आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, आयपीएलची खरी किंमत होम-अँड-अवे फॉरमॅटमध्ये आहे. जर कॅलेंडरमध्ये सामन्यांसाठी जागा नव्हती, तर संघांची संख्या वाढवायला नको होती. ते म्हणाले, आम्ही आयपीएल अशा प्रकारे विकले नव्हते. त्यांनी प्रश्न विचारला की सर्व संघांनी या बदलाला सहमती दिली होती का आणि म्हणाले की असे झाले नसेल.94 सामने असते तर कमाई वाढली असती ते म्हणाले, जर होम-अँड-अवे फॉरमॅटमध्ये 94 सामने झाले असते आणि प्रत्येक सामन्याची किंमत 118 कोटी रुपये असती, तर मीडिया हक्कांमधून 2,400 कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई झाली असती. म्हणजेच, बीसीसीआयला 2,400 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला असता. यापैकी 1,200 कोटी रुपये 10 संघांना मिळाले असते, प्रत्येक संघाला 120 कोटी रुपये, आणि संघांचे मूल्य वाढले असते.

दरम्यान, आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात निलंबित झाले ललित मोदींना 2010 मध्ये आयपीएलच्या तिसऱ्या हंगामाच्या अंतिम सामन्यानंतर लगेचच बीसीसीआय ने निलंबित केले. त्याच वर्षी अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळाल्याचे कारण देत ते भारत सोडून लंडनला गेले. नंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी ) त्यांच्याविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आणि त्यांचा पासपोर्टही रद्द करण्यात आला.तेव्हापासून ललित मोदी लंडनमध्ये राहत आहेत. त्यांच्याविरुद्ध आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावात हेराफेरी, मनी लॉन्ड्रिंग आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) च्या उल्लंघनाची प्रकरणे सुरू आहेत.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे वर्चस्व
वाशिम – जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना लवकरच उपलब्ध होणार सुविधा
ईशान किशन आयसीसी टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी; संजू सॅमसनची १८ स्थानांची झेप विश्वचषकातील दमदार कामगिरीनंतर ईशान किशन आयसीसी टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे; संजू सॅमसनने १८ स्थानांची झेप घेतली आहे, तर रशीद खानने वरुण चक्रवर्तीला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.
मुल्लानपूर येथे थरारक आयपीएल सामन्यात PBKS चा GT वर तीन गडी राखून विजय
संजीवनी अकादमीच्या साई भागवतची महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉल संघात निवड

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article प. बंगालमधील आसनसोलमध्ये ९ एप्रिलला पंतप्रधानांची जाहीर सभा
Next Article **बिहारमध्ये राजकीय स्थित्यंतर: नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम मंत्रिमंडळ बैठक**
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?