cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > चाकूरमध्ये तंबाखू माफियांवर पोलिसांची धाड; ३.७५ लाखांचा साठा जप्त
Crime

चाकूरमध्ये तंबाखू माफियांवर पोलिसांची धाड; ३.७५ लाखांचा साठा जप्त

CliQ INDIA
Last updated: April 8, 2026 6:31 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE
पोलीस कारवाई

लातूर, 07 एप्रिल, (हिं.स.)। जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने चाकूर येथे टाकलेल्या धाडीत प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा ₹3.75 लाखांचा साठा जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वामी विवेकानंद चौक परिसरातील “राज कन्फेक्शनरी” दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी मारुती राजेंद्र सोमवंशी (वय 33, रा. चाकूर) यास ताब्यात घेण्यात आले. गोडाऊनची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये NO.4101 Premium Chewing Tobaccoच्या 16 पोत्या, सुगंधी तंबाखूच्या 6 पोत्या आणि Extra Freshness नावाच्या 3 पोत्यांचा समावेश असून, एकूण किंमत ₹3,75,000 आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे यांनी सहभाग घेतला. तसेच चाकूर पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार बोळंगे यांनीही सहकार्य केले.

सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अंतर्गत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री हा गंभीर गुन्हा असून, अशा अवैध कृत्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

You Might Also Like

गडचिरोली – सेवानिवृत्त वृध्द परिचारिकेच्या घरात घुसुन जबरी चोरी, एकूण चार अटकेत | BulletsIn
अकोला – सावत्र बापानेच संपविले नऊ वर्षाच्या मुलाला
२५ हजारांची लाच स्वीकारताना अंबाजोगाईचा सहकार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
गाय गोठ्यासाठी बनावट नोटांच्या मदतीने फसवणूक; दोघे आरोपी अटकेत | BulletsIn
आळंदीत 6 वर्षांच्या चिमुरडीची गळा आवळून हत्या

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नितीश कुमार यांना राजीनामा देण्याची तयारी, बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या योजनांसह राजकीय सत्ता परिवर्तन सुरू
Next Article एअर इंडियाच्या तिकीट दरात होणार वाढ; नवीन दर ८ एप्रिलपासून होतील लागू
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?