cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > प्रोटीयन ई-जीओव्ही टेक्नॉलॉजीजकडून मुंबईतील साकी नाका येथे आधार सेवा केंद्राचे उद्घाटन
Business

प्रोटीयन ई-जीओव्ही टेक्नॉलॉजीजकडून मुंबईतील साकी नाका येथे आधार सेवा केंद्राचे उद्घाटन

CliQ INDIA
Last updated: January 1, 2026 6:32 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 31 डिसेंबर (हिं.स.)।लोकसंख्येच्या प्रमाणात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) उभारण्यात अग्रेसर असलेल्या प्रोटीयन ई-गव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेडने (BSE: 544021; NSE: INE004A01022) भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) निर्देशांनुसार, मुंबईतील साकी नाका येथे नवीन आधार सेवा केंद्राच्या (ASK) शुभारंभाची घोषणा केली. शहरातील सर्वात व्यस्त निवासी आणि व्यावसायिक भागांपैकी एका भागात नागरिकांना आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवांची सुलभता मिळवून देणे हा या नवीन केंद्राचा उद्देश आहे.

नव्याने सुरू झालेले आधार सेवा केंद्र हे आधार नोंदणी, भौगोलिक आणि बायोमेट्रिक अपडेट्स, आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी सेवांसह विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देईल. सातत्यपूर्ण, सुरक्षित आणि नागरिक-स्नेही अनुभव देण्यासाठी सुरू केलेल्या या केंद्राचा उद्देश आधार-संबंधित गोष्टींचे वेळेवर आणि विश्वासार्ह निराकरण सुनिश्चित करणे हे आहे.

या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रोटीयन ई-गव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. सुरेश सेठी म्हणाले, “आधारशी संबंधित सर्व सेवांसाठी ‘उत्कृष्टता केंद्र’ (सेंटर्स ऑफ एक्सलन्स) म्हणून आधार सेवा केंद्रांचे (ASKs) देशव्यापी जाळे स्थापन करण्याच्या सरकारच्या दूरदृष्टीचे आम्ही कौतुक करतो. 188 जिल्ह्यांमध्ये आधार सेवा केंद्रे स्थापन करण्याची आणि चालवण्याची यूआयडीएआय (UIDAI) कडून प्रोटीयनला मिळालेली जबाबदारी म्हणजे मोठ्या लोकसंख्येसाठी पायाभूत सुविधा पुरवण्याच्या आमच्या क्षमतेवर झालेले शिक्कामोर्तब आहे. या कार्यक्षमतेमुळे आधार आणि पॅन ही दोन्ही मूलभूत डिजिटल ओळखपत्रे व्यवस्थापित करण्याची आणि त्यांचा विस्तार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली प्रोटीयन ही देशातील एकमेव संस्था ठरली आहे. ही दोन्ही ओळखपत्रे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा आधार आहेत. या उपक्रमाच्या व्यापकतेपलीकडे, यूआयडीएआयसोबतची आमची सामायिक वचनबद्धता दर्शवते. यामुळे या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील याची काळजी घेतली जाते. यामुळे देशभरातील लाखो लोकांसाठी आधार अधिक सुलभ, सुरक्षित आणि नागरिक-केंद्रित बनेल.”

डीडीजी, आरओ मुंबई यांनी संचालक आणि उपसंचालक, महाराष्ट्र यांच्यासमवेत मुंबईतील साकीनाका येथील आधार सेवा केंद्राला भेट देऊन केंद्राच्या कामकाजाचा औपचारिक शुभारंभ केला. कर्मचाऱ्यांना संबोधित करताना, त्यांनी नागरिकांना सक्षमतेने आणि माणुसकी जपत सेवा देण्याच्या महत्त्वावर भर दिला. यूआयडीएआयचे प्रतिनिधी म्हणून, प्रत्येक संवादात विश्वास आणि प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, याचीही आठवण त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना करून दिली.

यूआयडीएआय सेवांसाठी एएसकेला एक खरे उत्कृष्टता केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या प्रोटीयनच्या सक्रिय प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. तसेच कार्यान्वयन सज्जता आणि सेवेच्या गुणवत्तेप्रती असलेल्या वचनबद्धतेची त्यांनी दखल घेतली.

कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच, उपमहासंचालकांनी नव्याने कार्यान्वित झालेल्या एएसकेमधील रहिवाशांशी संवाद साधला, त्यांचे अनुभव ऐकले आणि त्यांना उपलब्ध सेवांचा पूर्णपणे वापर करण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या या साधण्यामुळे नागरिक-केंद्रित सेवा वितरणाच्या यूआयडीएआयच्या ध्येयाला बळकटी तर मिळालीच आणि एएसके हे सुलभता, कार्यक्षमतेचे एक आदर्श उदाहरण म्हणून समोर आले.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (UIDAI) प्रोटीयनला देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये आधार सेवा केंद्रे स्थापन करण्याबाबत आणि चालवण्याबाबत अलीकडेच आदेश मिळाले होते. त्यानंतरच हे उद्घाटन झाले आहे. यानुसार, प्रोटीयन देशभरातील 188 जिल्ह्यांमध्ये आधार सेवा केंद्रे सुरू करेल, ज्यामुळे या सेवा समाजाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतील आणि नागरिकांना उत्तम सेवा देण्याच्या UIDAI च्या दृष्टिकोनाला बळकटी मिळेल.

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

भारतातील पहिल्या ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड कोळसा गॅसिफिकेशन आणि कार्बन कॅप्चर प्रकल्पाचा शुभारंभ
विवो एक्स200टी भारतात लॉन्च – Hindusthan Samachar Marathi
WTO चर्चेत भारत अमेरिकेसमोर ठाम; कृषी अनुदान, डिजिटल करावरून वाद कायम
उद्योग जगताकडून भारत टेक्स 2024 या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमाचे आयोजन
लावा ब्लेज़ एमोलेड 2 5जी; १६ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article निवडणुकीच्या पार्श्वभूमी :  सोलापूरच्या पोलिस आयुक्तांची धडक कारवाई!
Next Article अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?