cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > रायपूरमध्ये भारतीय संघाचे एकदिवसीय मालिका जिंकण्याचे लक्ष्य
Sports

रायपूरमध्ये भारतीय संघाचे एकदिवसीय मालिका जिंकण्याचे लक्ष्य

CliQ INDIA
Last updated: December 3, 2025 6:38 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

रायपूर, 2 डिसेंबर (हिं.स.)निराशाजनक कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाने रांची येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून जोरदार पुनरागमन केले. पण यजमान भारतीय संघासाठी हा विजय सोपा नव्हता आणि पहिल्या डावात ३४९ धावा करूनही भारताने फक्त १७ धावांनी विजय मिळवला. नियमित एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या एकदिवसीय मालिकेत खेळत नाहीत आणि केएल राहुलने कर्णधारपद स्वीकारले आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने आपला जुना फॉर्म दाखवत १२० चेंडूत १३५ धावांचे शानदार शतक झळकावले आणि त्याचे ५२ वे एकदिवसीय शतक साजरे केले. सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतकी भागीदारी केल्यानंतर कोहली आणि रोहित शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही शतकी भागीदारी केली. हे दोन दिग्गज भारतीय फलंदाज २०२७ च्या विश्वचषकात त्यांच्या स्थानाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या बॅटने देत आहेत. रायपूर वनडेमध्ये दोघांकडून पुन्हा एकदा मोठी खेळी होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे भारतीय संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.

पहिल्या वनडेमध्ये ऋतुराज गायकवाडचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये करण्यात आला होता. पण त्याने १४ चेंडूत केवळ ८ धावा करत निराशा केली. यामुळे दुसऱ्या वनडेमध्ये त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी दिली जाईल का असा प्रश्न निर्माण होतो. गुवाहाटीमध्ये पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या ऋषभ पंतला रांची वनडेमध्ये संधी मिळाली नाही आणि कर्णधार राहुलनेही यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळली होती.

गोलंदाजीत हर्षित राणाने पहिल्या वनडेमध्ये आपल्या पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेऊन प्रभावित केले आणि जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या अनुपस्थितीत तो पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे कुलदीप यादवने फिरकी गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आणि सामना भारताच्या हातून निसटत चालला असताना, त्याने एकाच षटकात दोन मोठ्या विकेट्स घेऊन संघाला सामना जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. रायपूर वनडेमध्येही कुलदीप यादवकडून संघाला मोठ्या आशा असतील.

दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रिट्झकेने पहिल्या वनडेमध्ये ७२ धावा केल्या आणि त्याच्या वनडे पदार्पणापासूनचा त्याचा सातत्यपूर्ण फॉर्म पाहता, दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. त्याचप्रमाणे मार्को जॅन्सन आणि त्याचा जोडीदार कॉर्बिन बॉश यांनी रांची वनडेमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केल होता. पण शेवटी उच्च धावसंख्येमुळे ते कमी पडले. पण दुसऱ्या वनडेमध्ये ही जोडी पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करेल आणि भारतीय संघ त्यांना कमी लेखणार नाही. दुसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्याचा दक्षिण आफ्रिका आतूर असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या वनडेसाठी टेम्बा बावुमा आणि केशव महाराज या दोघांना विश्रांती दिली होती. दुसऱ्या वनडेसाठी दोन्ही क्रिकेटपटू संघात परतू शकतात. त्यामुळे मागील सामन्यातील कोणत्या दोन क्रिकेटपटूंना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला गेला आहे. जानेवारी २०२३ मध्ये भारताने न्यूझीलंडला एकतर्फी सामन्यात ८ विकेट्सने पराभूत केले होते. प्रथम खेळताना किवी संघ फक्त १०८ धावांवर गुंडाळला गेला आणि भारताने २०.१ षटकात २ विकेट्स गमावून विजय मिळवला होता. रायपूरमध्ये पुन्हा कमी धावांचा सामना होईल की, रांची वनडेसारखा धावांचा डोंगर रचला जाईल याकडेच क्रिकेट चाहत्याचं लक्ष असेल.

—————

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

You Might Also Like

सोफी डिव्हाईन पुढील दोन WBBL हंगामांसाठी पर्थ स्कॉर्चर्ससोबत राहील | BulletsIn

सूर्यकुमार यादवने टी-२० विश्वचषक ट्रॉफीसह अडालज बावडीला दिली भेट

भारताच्या न्यूझीलंडवरील ऐतिहासिक विजयानंतर, सूर्यकुमार यादवने टी-२० विश्वचषक ट्रॉफीसह अडालज येथील पायरी विहिरीला भेट दिली.
महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेला ठाण्यात शुभारंभ
आर अश्विनच्या निवृत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भावनिक पत्र | BulletsIn
दीवमध्ये पहिल्या वहिल्या समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धांत म.प्र.ने पटकावले एकंदर विजेतेपद

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article राज्यात आचार संहिता 20 डिसेंबरपर्यंत राहणार
Next Article प्राजक्ता गायकवाडचे कन्यादान वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर यांच्या हस्ते संपन्न
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?