पुणे, 8 नोव्हेंबर (हिं.स.)बाजार समितीत भूसार व्यापारी असलेले भुतडा यांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४१ लाख रुपयांना गंडा घातला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी सोलापूर शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अरेस्ट केली व अटकेची भीती दाखवून ही फसवणूक केली आहे.
मागच्या महिन्यात अनोळखी क्रमांकावर भुतडा यांना एक कॉल आला. नरेश गोयल हा खूप मोठा फ्रॉडर असून त्याच्या खात्यातून तुमच्या बॅंक खात्यात २५ लाख रुपये ट्रान्स्फर झाल्याचे सांगितले. तुमच्या सीमकार्डवरून समोरील व्यक्तीलाही पैसे पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तुम्हाला ईडी, सीबीआय व पोलिसांची नोटीस आली असून आता कधीही अटक होऊ शकते, अशी भीती दाखविली. त्याचवेळी ‘या गुन्ह्याचा तपास होईपर्यंत आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय’ असे सांगून त्यांना व्हिडिओ कॉल करून बसवून ठेवले.भुतडा यांच्या मोबाईलवर त्यांच्या मुलाचा फोन येत असल्याने त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर कॉल केला. अटकेच्या भीतीने या तीन दिवसांत भुतडा यांच्याकडून सायबर गुन्हेगारांनी ४१ लाख रुपये घेतले. सायबर गुन्हेगारांनी समोरील पाच बॅंक खात्यात ते पैसे ट्रान्स्फर केले. घाबरलेल्या ६९ वर्षीय व्यापाऱ्याने तीन दिवसांत त्यांनी स्वत:च्या कमाईची संपूर्ण रक्कम सायबर गुन्हेगारांना पाठवून दिली.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
