सोलापूर, 12 सप्टेंबर, (हिं.स.)। घरी असताना दोन अनोळखी क्रमांकावरून सम्राट चौकातील एका करवा नामक व्यावसायिकास कॉल आला. एकाने त्यांच्याकडे ग्रीन गवताची मागणी करीत ॲडव्हान्स पाठविले होते. करवा यांनी व्हॉट्सॲपवरील ओळखीच्या व्यक्तीकडून समोरील व्यक्तीला ते गवत पोच केले होते. सुरवातीला ३० हजार रुपयांचे गवत दिले, पण त्यानंतर विश्वास संपादन करून सायबर गुन्हेगारांनी करवा यांना सव्वादोन लाख रुपयाला फसविले. यासंदर्भात सोलापूर शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.करवा यांना एका व्यक्तीने कॉल केला. त्या व्यक्तीने करवा यांच्याकडे ग्रीन गवताची मागणी करीत ३० हजार रुपये ॲडव्हान्सही पाठविले. त्यानंतर मागील काही दिवसांपासून करावा यांना एका नंबरवरून ग्रीन गवतासह आमच्याकडे विविध वस्तू मिळतात असे मेसेज येत होते. त्या व्यक्तीकडे करवा यांनी ग्रीन गवताची चौकशी केली.त्यानुसार त्या व्यक्तीने ग्रीन गवत करवा यांना दिले. काही दिवसांनी समोरील व्यक्तीने करवा यांच्याकडे आणखी ग्रीन गवताची मागणी केली. आपल्याला दोन पैसे मिळतील म्हणून करवा यांनी स्वत:च ग्रीन गवत पोच करणाऱ्या व्यक्तीला ॲडव्हान्स रक्कम पाठविली. परंतु, ग्रीन गवत पुरवठा करणारा व मागणी करणाारा हे दोघेही एकच असल्याची कल्पना करवा यांना नव्हती.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
