पंढरपूर, 7 ऑगस्ट, (हिं.स.)। महाराष्ट्रातील पंढरपुरवारीत अमृतंजन हेल्थकेअर लिमिटेडने वारक-यांसाठी आरोग्यसेवा दिली. जुलै महिन्यात पार पडलेल्या या धार्मिक कार्यात वारक-यांसाठी आरोग्य सेवा पुरवत अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. ही वारी देशातील प्रतिष्ठित आध्यात्मिक यात्रांपैकी महत्त्वाची यात्रा मानली जाते. अमृतांजन हेल्थकेअरने १ जुलै ते ६ जुलै या काळात हजारो वारक-यांसाठी आरोग्यसेवा दिली. कित्येक किलोमीटर पायी चालणा-या वारक-यांना आरोग्य सेवा मिळाल्याने त्यांच्या शारिरीक वेदना कमी झाल्या. वारक-यांना यात्रेदरम्यान होणारा त्रास कमी झाल्याने त्यांचा हा प्रवास सुखकर झाला. गेल्या चार वर्षांपासून आरोग्यसेवा देण्यासाठी अमृतांजन वारीमध्ये सहभागी होत आहे. हा कायमस्वरुपी सहभाग अमृतांजनने वारक-यांसाठी सुरु केलेल्या या उपक्रमातील आरोग्य, विश्रांती आणि कल्याण या मूल्यांवरील त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. समाजाला ज्यावेळी गरज भासते त्यावेळी अमृतांजन हेल्थकेअर समाजाला मदत करण्यातासाठी सदैव तत्पर असतो, ही वचनबद्धता या उपक्रमातून दिसून आली.
दरवर्षी लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होतात. या दिंडीदरम्यान वारक-यांना फार मेहनत घ्यावी लागते. त्यांचे शारिरीक परिश्रम ध्यानात घेत अमृतांजन कंपनीने वारक-यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये अमृतांजन कंपनीने आपल्या काही उत्पादनांचे वाटपही केले. अमृतांजन पेन रिलीफ-ऑन, जॉइंट मसल स्प्रे, बॅकपेन रोल-ऑन, पेन बाम, ओआरएस पावडर आणि पिवळा बाम आदी उत्पादने वारक-यांना दिली गेली. ही उत्पादने वारक-यांच्या वेदना कमी करण्यासाठी आणि शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी काळजीपूर्वक निवडण्यात आली होती. अनेक वारकरी या दिंडीत २५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी चालतात. या उत्पादनांच्या वापराने वारक-यांच्या शारिरीक वेदना कमी झाल्या.
पंढरपूरवारीत वारक-यांना आरोग्यसेवा देण्याच्या उपक्रमाबाबत अमृतांजन हेल्थकेअरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.एस.संभू प्रसाद यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “ लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाच्याक्षणी त्यांची सेवा करण्यावर उपक्रम राबवणे हा अमृतांजनचा वारसा आहे. लोकांच्या दैनंदिन आयुष्यासह वारीसारख्या धार्मिक यात्रेतही आम्ही त्यांना सेवा देतो. पंढरपूरवारी ही अध्यात्मिक वारी शारिरीकदृष्ट्या आव्हानात्मक ठरते. या वारीत सहभागी होणा-या वारक-यांना पाठिंबा देणे ही आमची जबाबदारी आहे. वारक-यांना आरोग्यसेवा देणे आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. केवळ उदाहरण म्हणून हा उपक्रम राबवला जात नाहीये. आम्ही हा उपक्रम वारक-यांसाठी असलेली काळजी, त्यांच्या एकतेचा सन्मान करण्यासाठी करत आहोत. आपल्या ग्राहकांबाबत सहानुभूती असल्याने हा उपक्रम राबवला जात आहे. काळजी आणि आरोग्यावर आधारलेला ब्रँण्ड म्हणून आम्हाला सलग चौथ्या वर्षी वारक-यांच्या वेदना कमी करण्यासाठी तसेच त्यांना डायड्रेशन सोल्यूशन्स देण्याचे भाग्य लाभले.”
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
