
मुंबई, 20 जुलै (हिं.स.)।बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोनू हा त्याच्या अभिनयापेक्षा समाजकार्यासाठी ओळखला जातो. लॉकडाऊन मध्ये त्याने लोकांना मदत केल्याने तो चर्चेत आला त्यानंतर आता सोनू सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला असून या व्हिडीओने सगळ्यांचं मनं जिंकली आहेत.
नुकताच सोनू सूदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने चक्क हातामध्ये साप पकडला आहे. सोनू सूदच्या सोसायटीत साप शिरला होता. त्या सापाला हाताने पकडून सोनू सूदने पोत्यात भरलं आणि जीवनदान दिलं. शिवाय सोनू सूद त्याच्या गार्डला सापला जंगलात सोड असं सांगतो. दरम्यान, या व्हिडीओमध्ये अभिनेता म्हणतो की, हा साप आमच्या सोसायटीत आला. हा एक रॅट स्नेक आहे. तो विषारी नाही. तुमच्या परिसरात किंवा सोसायटीत असा साप आढळला तर कृपया साप पकडणाऱ्या एक्सपर्ट्सना बोलवा. पण, काळजी घेणं गरजेचं आहे. मला साप पकडायची टेक्निक माहित आहे, म्हणून मी त्याला पकडलं, पण काळजी घ्या. सोनू सूदच्या व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
