मुंबई, 12 जुलै (हिं.स.) : कायरन पोलार्डने फाफ डू प्लेसिसच्या टेक्सास सुपर किंग्जविरुद्ध शानदार विजयाची नोंद केली. एमआय न्यूयॉर्कला मेजर लीग क्रिकेटच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. आता१३ जुलै रोजी त्यांचा सामना वॉशिंग्टन फ्रीडमशी होणार आहे.
सुपर किंग्जविरुद्धचा पहिला क्वालिफायर सामना पावसामुळे वाया गेला होता. तेव्हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिल्यामुळे अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सुपर किंग्जने निकोलस पूरनच्या न्यूयॉर्कला १६७ धावांचे
लक्ष्य दिले होते. जे एकेकाळी न्यूयॉर्कसाठी पोहोचणे कठीण वाटत होते. पण कायरन पोलार्ड आणि निकोलस पूरन या
दोघांनी ४० चेंडूत ८९ धावांची भागीदारी केली. आणि न्यूयॉर्कला एक षटक आधीच सात विकेट्सने विजय मिळवून दिला.
१५ व्या षटकात न्यूयॉर्कला ३० चेंडूत ६१ धावांची आवश्यकता होती. पूरन आणि पोलार्ड मैदानावर उपस्थित होते. लक्ष्य आणि चेंडूंमध्ये खूप मोठा फरक होता. जो या कॅरेबियन जोडीने १७ व्या षटकात पूर्णपणे कमी केला. झिया-उल-हकच्या या षटकात पोलार्डने दोन षटकार आणि दोन चौकार मारले. त्यानंतर न्यूयॉर्कचे लक्ष्य १८ चेंडूत फक्त २७ धावांवर कमी झाले. पुढच्या षटकात पूरनने एक षटकार आणि एक चौकार मारून न्यूयॉर्कला विजयाचा मार्ग सुकर करुन दिला.
———–
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
