नवी दिल्ली, 22 जून (हिं.स.) :
इस्रायल
आणि इराणमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. आज सकाळी अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर
हल्ला केला. अमेरिकेच्या या कारवाईनंतर जगात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष
पजशिक्यान यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि इराण आणि इस्रायल संघर्षावर चिंता
व्यक्त केली.
पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी सोशल मीडियीच्या माध्यमातून लिहिले आहे की, मी इराणचे राष्ट्राध्यक्ष पजशिकयान यांच्याशी
बोललो आहे. आम्ही या प्रदेशातील सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली आणि
वाढत्या तणावाबद्दल तीव्र चिंता देखील व्यक्त केली आहे. मी तणाव कमी करण्यासाठी
संवाद आणि राजनैतिक कूटनीतिला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. तसेच शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेची गरज यावर भर दिला आहे.
अमेरिकेने
फोर्डो, नतान्झ
आणि इस्फहान या इराणच्या तिन्ही अणुस्थळांवर हल्ला केला होता. १३ जूनच्या
सकाळपासून इस्रायलने इराणविरुद्ध मोर्चा उघडला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने मिळून
इराणचे प्रचंड नुकसान केले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
