इस्लामाबाद, 22 जून (हिं.स.) अमेरिकेने
इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला करत ते नष्ट केले. आता पाकिस्तानच्या परराष्ट्र
मंत्रालयाने यावर एक निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानने स्पष्ट शब्दात म्हटले आहे
की, या हल्ल्याने अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले आहे. इराणविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे हिंसाचार आणि चिंता वाढत
आहे. आम्हाला याचा खूप त्रास होत आहे. जर हा तणाव आणखी वाढला तर त्याचे हानिकारक
परिणाम दिसू शकतात.
गेल्या
काही दिवसांपासून पाकिस्तान अमेरिकेचे कौतुक करताना थकत नाही आहे. पाक लष्करप्रमुख
असीम मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये
जेवणही केले होते. ट्रम्प यांना खूष करण्यासाठी मुनीर यांनी त्यांना नोबेल शांतता
पुरस्कार देण्याची विनंतीही केली होती. याला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ
यांनीही याला पाठिंबाही दिला होता. पण या मैत्रीला काही तास उलटताच पाकिस्तानने अमेरिकेबाबत
आता वेगळाच सूर आळवला आहे.
पाकिस्तानने
इराण, इस्रायल आणि अमेरिकेला संवादाद्वारे हा
प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले
आहे की, हा तणाव संवाद आणि राजनैतिक
कूटनीतिद्वारे सोडवण्यावर भर दिला पाहिजे.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
