केंद्रीय अर्थसंकल्प 2024 हा देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे, असे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत अर्थसंकल्पीय चर्चेत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांचा विचार केला असून, तो देशाला आत्मनिर्भर आणि जागतिक शक्ती बनविण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी व्यक्त केले.
BulletsIn
- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती यांच्या “कॉमन मॅन” (सामान्य नागरिक) केंद्रित विचारधारेनुसार अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.
- विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करून त्यांचे शोषण करीत असल्याची टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसकडून वारंवार अपमान केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 3 कोटी कुटुंबांना घरे मिळणार असून, त्यासाठी 5.36 लाख कोटींचा निधी दिला जाणार आहे.
- आयुष्यमान भारत योजनेतून 12 कोटी कुटुंब आणि 55 कोटी नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळत आहे.
- 70 वर्षांवरील 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखांपर्यंत उपचार विमा देण्यात आला आहे.
- मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर सवलत देण्यात आली आहे.
- कृषी विकास, स्टार्टअप्स, आर्थिक मजबुती, कर सुधारणा आणि रोजगार निर्मितीला या अर्थसंकल्पात विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
- टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेवर भर देण्यात आला असून, नव्या संशोधनाला चालना दिली जाणार आहे.
- हा अर्थसंकल्प गरीब, युवक, शेतकरी आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी समर्पित असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले.
