नाशिक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाशिक जिल्हा परिषदेत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आली.
या प्रसंगी मिलिंद घेगडमल या विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, विस्तार अधिकारी (शिक्षण) निलेश पाटोळे, भगवान बच्छाव यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती देत अभिवादन केले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, पंकज मेतकर, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, कृषि विकास अधिकारी माधवी गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
