काँग्रेसने घेतली निवडणूक आयोगाकडे धाव
नवी दिल्ली दूरदर्शनवर केरळ स्टोरी हा चित्रपट दाखवला म्हणून काँग्रेसने दूरदर्शनच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, पक्षाचे नेते सलमान कुर्शीद, पवन खेडा, मुकुल वासनिक आणि गुरदीप सप्पल यांनी सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची (ईसी) भेट घेतली. यावेळी एकूण 6 तक्रारींवर चर्चा केली, त्यापैकी दोन पंतप्रधान मोदी आणि भाजप विरोधात होत्या. मुस्लिम लीगबाबत मोदी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल नेते तक्रार होती. याशिवाय ‘केरला स्टोरी’ दूरदर्शनवर दाखवल्याबाबतही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
