अमरावती: आज भारतीय जनता पार्टी चा ४५ वा स्थापना दिनानिमित्त भाजपा अमरावती शहर कार्यालय राजापेठ येथे भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रविण पोटे पाटील यांनी ध्वजारोहण केले. या प्रसांगी लोकसभेच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा उपस्थित होत्या. यावेळी लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांचा वाढदिवसाच्या व भाजपा स्थापना दिन एकाच दिवशी येण्याचा योगायोग साधुन नवनीत राणा यांचे स्वागत करून व केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले.अध्यक्ष आ.प्रवीण पोटे यांनी या प्रसगी भाजपा पक्ष वाढण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी तन मन धनाने परिश्रम घेतले त्यांची उपकाराची कार्यकर्त्यांनी जाणीव ठेवावी आणि पक्ष वाढवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.नवनीत राणा यांचा रूपाने पक्ष नेत्यांनी अत्यंत सुयोग्य उमेदवार अमरावती लोकसभेसाठी कमळ चिन्हावर दिला आहे . त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपा कार्यकर्त्याची आहे. ती आपण पूर्ण करु असे सांगितले.
या प्रसंगी नवनीत राणा यांनीही आपले विचार यावेळी मांडले. व्यासपीठावर जयंत डेहनकर, शिवराय कुलकर्णी, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर, दिनेश सूर्यवंशी, चेतन पवार, नितीन धांडे, एड प्रशांत देशपांडे, सुनील काळे, अनिताताई राज, गंगाताई खारकर, सतीश करेसिया, विवेक कलोती कौशिक अग्रवाल सह सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते
