रत्नागिरी, 6 फेब्रुवारी : लांबेवाडी-फणसवणे (ता. संगमेश्वर येथून) चांदणी चंद्रकांत सावंत (वय ४० वर्षे) ही महिला ११ डिसेंबर २०१५ पासून बेपत्ता असल्याची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या महिलेची उंची ५ फूट ४ इंच, रंग निमगोरा, डोळे तिरळे, नाक सरळ, डाव्या पायाच्या घोट्याजवळ जखम, केस लांब काळे, वेणी, हातात काचेच्या हिरव्या बांगड्या, गळ्यात काळ्या मण्यांचे नकली मंगळसूत्र आणि नकली चेन, कानात नकली झुमके, उजव्या हाताच्या मनगटावर चंद्रकांत गोंदलेले आहे. पायांत स्लीपर, अंगावर सहावारी काळ्या निळ्या रंगाची व फुलांची साडी व लाल रंगाचा ब्लाऊज असे या महिलेचे बेपत्ता झाले तेव्हाचे वर्णन आहे. तिचे शिक्षण नववीपर्यंत झाले असून सोबत रेशन कार्ड आणि मोबाइल (क्र. ७०५७३३३५४५) आहे. ही महिला कोणास आढळल्यास संगमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
