इगतपुरी, २२ जानेवारी (हिं.स.) – कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमाखदार आणि तेवढ्याच पवित्र, धार्मिक वातावरणात पार पडला. यानिमित्त ठिकठिकाणी श्रीरामाला विविध प्रकारे अभिवादन केले जात आहे. एकूणच देशभरात उत्साहाचे आणि धार्मिकतेचे वातावरण आहे. याचाच एक भाग म्हणून इगतपुरीतील माधुरी पैठणकर यांनी १० बाय १० आकारात प्रभू श्रीरामांची भव्य रांगोळी साकारून प्रभू रामचरणी अनोखे अभिवादन केले आहे.
हिंदुस्थान समाचार
