गोंदिया २१ जानेवारी (हिं. स.) : गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची तस्करी करण्यात येते. अवैध वाळू तस्करी थांबावी याकरिता वारंवार परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने प्रशासनावर व महसूल विभागाला निवेदन देण्यात येतात. अशातच आता सडक अर्जुनी येथील उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे यांनी कारवाई करत वाळू तस्करी करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई केली आहे. या दोन्ही ट्रॅकर मालकांकडून दोन लाख 44 हजार 570 रुपये दंड वसूल करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
