डोंबिवली, १८ जानेवारी, (हिं.स) : डोंबिवली स्टेशनपुढे लोकलची ठोकर लागून एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ७ जानेवारी रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात मृत्यू पावलेल्या इसमाचा ओळख पटली नव्हती. मयत व्यक्तीच्या शर्टावर रोहित मेन्स वेअर ओ टी सेक्शन UNR-3 असे दिसल्यावर वारसांचा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व पोलीस उपनिरीक्षक नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा पाटील, पोहवा गपाटे, पोशि भांडारकर व पोशि धडस यांनी उल्हासनगर येथील रोहित मेन्स वेअर टेलरचा शोध घेऊन त्याचा मोबाईल क्रमांकवर संपर्क साधला. त्याला मयत इसमाचा टेलर मार्क दाखविला. मयताचे कपडे व गळ्यातील तुळशीचे माळावरून त्यांनी हा इसम हा खोपोली येथे राहत तो त्यांचा भाऊ दत्ताराम रामचंद्र मोहिते यास माहिती दिली. मयताचे मुलासही कळविल्यावर त्याला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये जाऊन मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
हिंदुस्थान समाचार
