cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय कॅडेट एक्स्चेंज कार्यक्रमासाठी भारत-युके यांच्यात सामंजस्य करार
International

द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय कॅडेट एक्स्चेंज कार्यक्रमासाठी भारत-युके यांच्यात सामंजस्य करार

CliQ INDIA
Last updated: January 10, 2024 4:00 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

* संशोधन आणि विकास क्षेत्रात संरक्षण सहयोगाबाबत व्यवस्था पत्रावर स्वाक्षऱ्या

* संरक्षण क्षेत्रातील उद्योग विषयक सहकार्य वाढवण्यावर दिला भर

लंडन, 10 जानेवारी (हिं.स.) – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लंडन येथे युकेचे संरक्षण मंत्री ग्रांट शॅप्स यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही बाजूंकडून संकल्पनांच्या फलदायी देवाणघेवाणीसह ही बैठक अत्यंत स्नेहपूर्ण वातावरणात पार पडली. दोन्ही मंत्र्यांनी संरक्षण, सुरक्षा आणि सहकार्य विषयक मुद्द्यांवर केलेल्या चर्चेत संरक्षण क्षेत्रातील उद्योग विषयक सहकार्य वाढवण्यावर अधिक भर देण्यात आला. भारत आणि युके यांच्यातील संबंध केवळ व्यावहारिक नसून हे दोन्ही देश अनेक साम्य आणि सामायिक उद्दिष्टांसह नैसर्गिक भागीदार आहेत, यावर यूकेचे संरक्षण मंत्री ग्रांट शॅप्स यांनी अधिक भर दिला. दोन्ही देशांदरम्यान, विशेषतः हिंद-प्रशांत प्रदेशात वाढत्या धोरणात्मक एककेंद्रीकरणाची कौतुकाने नोंद घेतली.

या द्विपक्षीय संरक्षणविषयक बैठकीनंतर, भारत आणि युके यांच्यादरम्यान दोन करार करण्यात आले- पहिला होता द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय कॅडेट एक्स्चेंज कार्यक्रमाबाबत सामंजस्य करार आणि दुसरा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि युकेच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा (डीएसटीएल) यांच्या दरम्यान संशोधन आणि विकास क्षेत्रातील संरक्षण सहयोगाबाबत व्यवस्था पत्र. हे करार दोन्ही देशांच्या लोकांदरम्यान विशेषतः दोन्ही देशांच्या युवकांमध्ये वैचारिक देवाणघेवाणीला चालना देतील आणि दोन्ही देशांतील संरक्षण विषयक संशोधनाच्या सहयोगासाठी अधिक विस्तृत क्षेत्र उपलब्ध करून देतील.

याआधी 8 जानेवारी रोजी रात्री उशिरा लंडन येथे पोहोचल्यानंतर, संरक्षणमंत्र्यांनी मंगळवारी सकाळी टॅव्हीस्टॉक स्क्वेयर येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून लंडनमधील कार्यक्रमांना सुरुवात केली. या परिसराच्या जवळच असलेल्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे महात्मा गांधी यांनी वर्ष 1888 ते 1891 या काळात कायद्याचे शिक्षण घेतले. 9 जानेवारी या तारखेला प्रतीकात्मक महत्त्व आहे कारण वर्ष 1915 मध्ये याच तारखेला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईला परतले. परदेशातील भारतीय समुदायाने देशाच्या विकासाप्रति दिलेल्या समृद्ध योगदानाच्या स्मरणार्थ आता हा दिवस, भारतात प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो.

युकेच्या संरक्षणमंत्र्यांशी बैठक करण्यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना अश्व रक्षक परेड मैदानावर औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

जॉर्जियन ‘विदेशी एजंट्स’ विधेयक हुकूमशाहीच्या मागे पडण्याच्या चिंतेमध्ये मोठ्या प्रमाणात निषेधास उत्तेजन देते
अणुकरारावरील चर्चा थांबल्यानंतर अमेरिका-इराणमधील तणाव वाढल्याने रुबिओ इस्रायलला भेट देणार
गाझामध्ये हवाई हल्ला, आणखी ३४ जणांचा मृत्यू | BulletsIn
ट्रम्प यांच्या धमकीविरोधात ग्रीनलँडमध्ये हजारो लोक रस्त्यावर
दक्षिण कोरिया चे सुविधास्थळांमध्ये सोन्याच्या सिपाईंची विक्रीमध्ये उडी मिळवणारे अंदाज

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पुणे जिल्ह्याच्या एकूण ११२८ कोटी ८४ लक्षच्या प्रारुप आराखड्यास मान्यता
Next Article राजस्थान : बस कंडक्टरचा महिलेवर बलात्कार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?