मुंबई, 9 जानेवारी (हिं.स.) : एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल’, ‘हप्पू की उलटन पलटन’ आणि ‘भाबीजी घर पर है’मध्ये प्रेक्षकांना काही हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे.
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल’मधील एपिसोडबाबत अटल बिहारी वाजपेयी म्हणाले, ”अटल (व्योम ठक्कर) शिक्षकांकडे शाळेच्या वार्षिक दिन समारोहामध्ये हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सामील करण्याची विनंती करतो. पण शिक्षक अटलची विनंती नाकारतात. त्यानंतर अटल मुख्याध्यापकांकडे त्यांच्या सहभागासाठी विनंती करतो. वर्गमित्रांना सामील होण्यास प्रेरित केल्यानंतर देखील कोणीही पुढे येत नाही, ज्यामुळे अटलला वार्षिक दिन समारोह साजरीकरणामध्ये एकटे असल्यासारखे वाटते. त्या रात्री अटल कृष्णा देवीला (नेहा जोशी) वचन देतो की, तो तिच्यासाठी वार्षिक समारोहामध्ये स्पर्धा व रोख बक्षीस जिंकेल. दुसऱ्या दिवशी अटल कार्यक्रमासाठी कविता रचण्याचा प्रयत्न करतो. सुरूवातीला काहीसा गोंधळल्यानंतर अखेर तो यशस्वीरित्या त्याची पहिली कविता रचतो. त्यासंदर्भात अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी अटल त्याच्या वडिलांना कविता सांगतो, जे कवितेमध्ये काही सुधारणा करतात. कुटुंबाच्या आर्थिक अडचणींबाबत समजल्यानंतर अटल गजोधरला कचोरी बनवण्यामध्ये साह्य करत आपल्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्धार करतो. या कामादरम्यान अटलची कविता नकळतपणे कृष्णन बिहारीच्या हाताला (आशुतोष कुलकर्णी) लागते. अटलचे वडिल त्याला शिक्षा करतात आणि पैसे कमावण्यापेक्षा अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्यास सांगतात. अनेक अडथळे आल्यानंतर अटल त्याची कविता तयार करतो. समर्थक अटलच्या यशासाठी प्रार्थना करतात, तर विरोधक त्याच्या अपयशाची अपेक्षा करतात.”
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील एपिसोडबाबत दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ”बेनी (विश्वनाथ चॅटर्जी) कायदेशीर लढाईमध्ये खोदीच्या (शरद व्यास) बाजूने केस लढतो. दरम्यान, कमिशनर (किशोर भानुशाली) हप्पूला (योगेश त्रिपाठी) त्याबाबत चौकशी करण्याचा आदेश देतो. अम्मा व राजेश (गीतांजली मिश्रा) दागिन्यांची खरेदी करण्यासाठी जातात. पण, बेनी केस हरल्याची आणि खोदी त्यामध्ये फसला असल्याची दुर्दैवी बातमी सांगतो, ज्यासाठी दोन कोटी रूपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. हे ऐकल्यानंतर राजेश हताश होऊन जाते. या स्थितीमधून बाहेर पडण्यासाठी बेनी गरीब असण्याचे नाटक करण्याचा सल्ला देतो. कुटुंबासह हप्पू देखील गरीब असल्याचे नाटक करू लागतो. पैसे व दागिने वाचवण्यासाठी हप्पू आणि बेनी मोठा खड्डा खणतात. पण नितीन जाधवने साकारलेली भूमिका रिकव्हरी एजंट मनोहर त्यांचे कृत्य पाहतो, कुटुंब अधिक गरीब असल्याचे नाटक सुरू ठेवतात. शेवटी मनोहर चौकशीसाठी कमिशनरला घेऊन येतो, पण त्यांना काहीच सापडत नाही, ज्यामुळे ते गोंधळतात.”
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील एपिसोडबाबत विभुती नारायण मिश्रा म्हणाले, ”सक्सेना (सानंद वर्मा) टिका (वैभव माथूर) आणि टिलू (सलिम झैदीने साकारलेली भूमिका) यांच्या मदतीने एका चित्रपटाचे शूटिंग करत असतो. विभुती (आसिफ शेख) प्रेक्षक म्हणून शूटिंग पाहायला जातो. चित्रीकरणादरम्यान ‘रोटी चोर’ (ब्रेड थीफ) शब्दाचा विभुतीवर प्रभाव पडतो, ज्यामुळे त्याला चक्कर येते आणि जुन्या आठवणी येऊ लागतात, जेथे बालपणी त्याची ‘रोटी चोर’ म्हणून थट्टा केली जायाची. या शब्दाचा त्याच्यावर सखोल परिणाम झाला आहे, ज्यामुळे तो अनिताच्या (विदिशा श्रीवास्तव) ताटामधून रोटी हिसकावून घेण्यासारखी चुकीची वर्तणूक करू लागतो. त्यानंतर तिवारी (रोहिताश्व गौड) अनिताला, तसेच त्याच्या एनआरआय क्लायण्ट्सना त्याच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करतो. सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत असताना विभुती चुकीची वर्तणूक करू लागतो आणि सर्वांच्या ताटामधून रोटी घेऊ लागतो, ज्यामुळे त्यांना लाजिरवाणे वाटते. अनिता त्याचे कृत्य पाहून नाराज होते, ज्यानंतर विभुतीला माफी मागावी लागते. अम्माजी (सोमा राठोड) तिवारीला उपाय सांगते की, त्याला नुकतेच झालेल्या १० लाख रूपयांच्या आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यासाठी त्याने गरीबांना रोटी खायला दिली पाहिजे. तिवारी या सल्ल्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा विभुती पुन्हा एकदा त्यामध्ये अडथळा आणतो. तो सर्व रोटी हिसकावून पळून जातो. यावेळी विभुतीच्या कृत्यांचा राग आलेला तिवारी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवतो.”
हिंदुस्थान समाचार
