मुंबई, 4 जानेवारी (हिं.स.) : ‘का रे दुरावा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुरुची अडारकरचं पुन्हा झी मराठीवर पुनरागमन होत आहे, सुरुचीने साकारलेली अदिती खानोलकर ही भूमिका खूप गाजली होती. आता सुरुची झी मराठीवरील मालिकेतून पुन्हा पुनरागमन करत आहे, ह्या मालिकेचं नाव जरी गुलदस्त्यात असलं तरी तिची भूमिका ग्लॅमरस असणार आहे.
हिंदुस्थान समाचार
