cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > कलाकारांनी सांगितल्या नववर्ष स्वागताबाबतच्या त्यांच्या योजना
Entertainment

कलाकारांनी सांगितल्या नववर्ष स्वागताबाबतच्या त्यांच्या योजना

CliQ INDIA
Last updated: December 28, 2023 10:00 am
CliQ INDIA
Share
6 Min Read
SHARE

मुंबई, २८ डिसेंबर, (हिं.स) सर्वजण वर्ष २०२३ चा निरोप घेण्यासह उत्साहात नववर्ष २०२४ चे स्वागत करण्यास उत्सुक आहेत. एण्ड टीव्हीवरील कलाकार देखील त्यांच्या प्रियजनांसोबत नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्याची तयारी करत आहेत आणि त्यांच्या योजनांबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत मालिका ”अटल”मधील आशुतोष कुलकर्णी (कृष्णन बिहारी वाजपेयी) व नेहा जोशी (कृष्णा देवी वाजपेयी), मालिका ”हप्पू की उलटन पलटन”मधील योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग) व गीतांजली मिश्रा (राजेश), मालिका ”भाबीजी घर पर है”मधील शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी) व रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी).

मालिका ”अटल”मध्ये कृष्णन बिहारी वाजपेयीची भूमिका साकारणारे आशुतोष कुलकर्णी म्हणाले, ””नववर्ष माझ्यामध्ये उत्साह जागृत करतो. मी माझे प्रियजण व लाडक्या कुटुंबियांसोबत नववर्ष स्वागताचा आनंद घेतो. यंदा, माझी पत्नी आणि मी माझ्या आईवडिलांचे आवडते ठिकाण पुण्याला जाणार आहोत. आम्ही उत्साहपूर्ण योजना आखली आहे. आम्ही नववर्षाच्या पूर्वसंध्येला रेस्टॉरंटमध्ये डिनरचा आस्वाद घेणार आहोत. मी त्या उत्साहपूर्ण क्षणांचा आनंद घेण्यास उत्सुक आहे. मध्यरात्रीचे १२ वाजताच मी कुटुंबियांचे प्रेम व आनंदासह धमाल क्षणांचा अनुभव मिळण्याची अपेक्षा करतो. नववर्षाच्या पहाटेला जवळच्या प्रसिद्ध मंदिरामध्ये जाणार आहे. तेथे जाऊन नववर्षासाठी प्रार्थना करणे ही माझ्यासाठी हृदयस्पर्शी परंपरा बनली आहे, ज्यामधून नवीन आशा, इच्छा व आकांक्षा निर्माण होतात. या क्षणांमध्ये मी कुटुंबासोबत एकत्र असण्याचा आनंद घेतो, तसेच आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. सर्वांना नववर्ष प्रेम, समृद्धता व आशीर्वादाने भरलेले असो हीच सदिच्छा!””

मालिका ”हप्पू की उलटन पलटन”मध्ये राजेश सिंगची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा म्हणाल्या, ””आम्ही लोणावळा येथे जाऊन तेथील हिरवळीमधून साहसी हाइक्सचा आनंद घेणार आहोत, तसेच लुप्त रत्ने आणि मोहक दृश्यांचा आनंद घेणार आहोत, ज्यासाठी लोणवळा प्रसिद्ध आहे. सायंकाळच्या थंड वातावरणादरम्यान शेकोटीवर एकत्र येत कथा, विनोद शेअर करण्याचा, तसेच आमच्यामधील अविश्वसनीय क्षणांना उजाळा देण्याचा उत्साह अद्वितीय असेल. याव्यतिरिक्त, आम्ही काही वेळ आराम करणार आहोत, जवळच्या स्पा मध्ये जाऊन स्वत:ला नववर्षासाठी उत्साहित करणार आहोत. यंदा नववर्षाचे गेटवे फक्त गंतव्य नसून आम्ही तेथे अनेक संस्मरणीय आठवणी निर्माण करणार आहोत, ज्या डोंगर रांगांमध्ये दुमदुमतील आणि आमच्यामधील नाते अधिक दृढ करतील. या क्षणांमधून मला मैत्रीची आठवण येते, साध्या गोष्टींमध्ये देखील आनंदमय अनुभव मिळतो आणि प्रत्येक सरत्या क्षणासह अद्वितीय सौंदर्य पाहायला मिळते. आम्ही लोणावळाच्या नयनरम्य आकर्षकतेमध्ये सामावून जात दीर्घकालीन आठवणी तयार करणार आहोत आणि जल्लोषात व उत्साहात नववर्षाचे स्वागत करणार आहोत. तसेच अविश्वसनीय नववर्षाची संस्मरणीय सुरूवात करण्यास उत्सुक आहोत.””

मालिका ”भाबीजी घर पर है”मध्ये अंगूरी भाबीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे म्हणाल्या, ””माळशेज घाटातील माझ्या फार्महाऊसच्या अवतीभोवती नयनरम्य स्थळे व उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळते. ज्यामुळे माझ्या मनात निसर्गामध्ये सामावून जाण्याची भावना निर्माण होते. मी हिरवळीमधून फेरफटका मारणार आहे, नदीकाठी सहलीचा आनंद घेणार आहे आणि निसर्गातील अद्भुत गोष्टी पाहणार आहे. या क्षणादरम्यान मी सरत्या वर्षातील गोष्टींना उजाळा देणार आहे, मिळालेल्या शिकवणींचे कौतुक करणार आहे आणि नववर्षाची उत्साहत सुरूवात करणार आहे. हा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी निसर्गामध्ये सामावून जात स्वत:ला उत्साहित करण्याचा क्षण आहे. सरत्या वर्षासह मी माझ्या अवतीभोवती असलेल्या सौंदर्याचे आभार व्यक्त करते, तसेच नववर्षामध्ये उत्तम संधी मिळण्याची आशा करते. मी निसर्गामध्ये सामावून जात, तेथील सौंदर्याचा आनंद घेत नववर्षाचे उत्साहात व जल्लोषात स्वागत करणार आहे. सर्वांना आनंददायी सरप्राइजेजसह आनंदमय, समृद्ध वर्षाच्या शुभेच्छा!””

मालिका ”अटल”मध्ये कृष्णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्हणाल्या, ””नववर्ष स्वागतादरम्यान बहुतेक क्लब्स व बारमध्ये गर्दी असल्यामुळे मला या ठिकाणी जायला आवडत नाही. मी या काळादरम्यान घरामध्ये शांतमय वातावरणाचा आनंद घेण्याला प्राधान्य देते. माझ्या एका मैत्रिणीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला तिच्या घरी पार्टीचे आयोजन केले आहे. मी मैत्रिणींसोबत स्वादिष्ट पाककलांचा आस्वाद घेण्यास आणि गप्पागोष्टी करण्यास उत्सुक आहे. आम्ही काही गेम्स देखील खेळणार आहोत. मी स्वत: विचार-मंथन करण्याचे कार्य हाती घेतले असून त्याबाबत तयारीला देखील सुरूवात केली आहे आणि नियोजनाची आखणी देखील केली आहे. मालिका ”हप्पू की उलटन पलटन”मध्ये दरोगा हप्पू सिंगची भूमिका साकारणारे योगेश त्रिपाठी म्हणाले, ””सुदैवाने आमच्या टीमने नववर्षासाठी दोन दिवसाचा ब्रेक दिला आहे, ज्यामुळे मी माझ्या कुटुंबासोबत जवळच्या हिल स्टेशनवर जाणार आहे. माझे शूटिंगचे व्यस्त वेळापत्रक पाहता मला क्वचितच माझ्या मुलांसोबत वेळ व्यतित करायला मिळतो. ज्यामुळे नववर्ष स्वागताने मला त्यांच्यासोबत अनपेक्षित ट्रिपचा आनंद घेण्याची संधी दिली आहे. आम्ही भव्य साजरीकरणासह २०२४ चे स्वागत करणार आहोत आणि मी त्यासाठी खूप उत्सुक आहे.”” मालिका ”भाबीजी घर पर है”मध्ये मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारे रोहिताश्व गौड म्हणाले, ””मी मित्र परिवारांसोबत आरामदायी क्षणांचा, तसेच काही ”मी टाइम”चा आनंद घेण्यास उत्सुक आहे. माझ्या मित्रांची फूडप्रती आवड पाहता माझी पत्नी आणि मी सायंकाळच्या कार्यक्रमासाठी स्वादिष्ट मेन्यू तयार केला आहे आणि सोबत लाइव्ह म्युझिक देखील असणार आहे. मला प्रवास करायला आवडते, पण आम्ही नववर्षाच्या सुरूवातीला पर्यटनाचा आनंद घेणार आहोत. सर्वांसाठी नववर्ष आनंद व सुरक्षिततेने भरलेले असो ही सदिच्छा!””

पहा मालिका ‘अटल’ रात्री ८ वाजता, ‘हप्पू की उलटन पलटन’ रात्री १० वाजता आणि ‘भाबीजी घर पर है’ रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्त एण्ड टीव्हीवर!

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

‘कन्नी’च्या नवीन पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
सरोगसीवर भाष्य करणार 'डिलिव्हरी बॉय'
रसिकांसाठी पर्वणी ! झी मराठी अवॉर्ड्स २०२५ मध्ये ‘जोड्यांची धमाल’
श्रीनूने सर्वांसमोर दिली आपल्या प्रेमाची कबुली !
प्रसिद्ध अभिनेते आशीष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रस्ते अपघातात जखमी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पुलवामा सारखा दुसरा हल्ला होईल- मोहम्मद तल्हा मजहर
Next Article दाक्षिणात्य अभिनेते, डीएमडीकेचे प्रमुख विजयकांत यांचे निधन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?